Serious allegations on Pak captain: Neighbor girl said Babar Azam exploited for 10 years, threatened to kill her if she became pregnant | Loksatta

Babar Azam Leaked Video: “बाबर आझमने मला प्रेग्नेंट केले अन्…”, महिलेने PCBकडे केली कडक कारवाईची मागणी

Babar Azam Leaked Video: बाबर आझम सध्या वेगळ्याच अडचणीत सापडला असून त्याच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यावर अजून त्याची प्रतिक्रिया आलेली नाही.

Neighbor girl said Babar Azam exploited for 10 years, threatened to kill her if she became pregnant
सौजन्य- (ट्विटर)

Babar Azam Leaked Video:  पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम नव्या अडचणीत सापडला आहे. त्याचे अनेक खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. माध्यमांमध्ये असा दावा केला जात आहे की बाबर आझमचे सहकारी खेळाडूंच्या मैत्रिणींसोबत अफेअर होते आणि तो तिच्यासमोर तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी अटी घालत होता. याबाबतची संपूर्ण माहिती त्यामहिलेने दिली असून यावर अजूनही बाबर आझमने स्पष्टीकरण दिलेले नाही. ही घटना त्यावेळेसची होती जेव्हा त्या महिलेला बाबर आझमने लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्याने तिच्याशी लग्न केले नाही आणि तब्बल १० वर्षे तिला पत्नी बनवण्याच्या बहाण्याने तिच्याशी संबंध ठेवला असा आरोप त्याच्यावर तिने केला आहे.

बाबर आझम हा पाकिस्तान क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार आहे. तो एक उत्कृष्ट फलंदाज देखील आहे, त्याची तुलना विराट कोहलीसोबत केली जाते. पण सध्या तो (बाबर आझम) चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे, त्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे आक्षेपार्ह आहेत. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच बाबर आझमचे काही मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा दावा केला जात आहे. या मुली इतर कोणी नसून पाकिस्तान संघातील खेळाडूंच्या मैत्रिणी आहेत.

बाबर आझमने माझे लैंगिक शोषण केले

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे. पाकिस्तानातील एका मुलीने बाबरवर हे आरोप केले आहेत. पीडितेने पत्रकार परिषदेत सांगितले की, “लग्नाच्या बहाण्याने बाबरने १० वर्षे तिचे लैंगिक शोषण केले. ती गरोदर राहिल्यानंतर बाबरने तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली.” पाकिस्तानी वृत्तवाहिनी २४ न्यूज एचडी’ने ही पत्रकार परिषद दाखवली त्यात तिने हे गंभीर आरोप केले असून यावर बाबर आझमने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

पाकिस्तानी मीडियामध्ये मुलीचे नाव हमिजा असल्याचे सांगण्यात आले. पीडितेने सांगितले की, “मी आणि बाबर एकाच शाळेत शिकत होतो आणि आम्ही एकाच वस्तीत राहत होतो. त्याने मला प्रपोज केले आणि मी ते स्वीकारले. त्यावेळी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली नव्हती.

२०११ मध्ये कोर्ट मॅरेजसाठी घरातून पळून गेला

ती म्हणाली, “जसा वेळ पुढे सरकत गेला तसतसे आम्ही लग्नाचे नियोजन करू लागलो. आम्ही आमच्या कुटुंबीयांनाही सांगितले, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे २०११ मध्ये आम्ही घरातून पळून गेलो. बाबर मला नेहमी सांगत असे की आपण कोर्टात लग्न करू. या काळात आम्ही गुलबर्ग आणि पंजाब हाऊसिंग सोसायटीत भाड्याने राहिलो, पण त्याने लग्न केले नाही.” बाबरच्या खर्चाचीही अनेकवेळा काळजी घेतल्याचे हमिजा यांनी सांगितले. ती म्हणाली, “बाबरची २०१४ मध्ये राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाली होती. त्याच्या वागण्यात हळूहळू बदल होऊ लागला. पुढच्या वर्षी मी त्याला पुन्हा लग्नासाठी विचारले, पण त्याने पुन्हा नकार दिला.”

२०१५ मध्ये गर्भवती होती, जिवे मारण्याची धमकी दिली

हमिजा म्हणाली, “२०१५ मध्ये मी बाबरला सांगितले की त्याच्यापासून मी प्रेग्नेंट आहे. यावर त्याची प्रतिक्रिया फारच विचित्र होती. त्याने माझे शारीरिक शोषण केले. मात्र, आम्ही घरातून पळून आल्यामुळे आणि कुटुंबाचा माझ्यावरील विश्वास उडाला असल्याने मी माझ्या घरी परत जाऊ शकले नाही. त्याकाळात बाबरच्या मित्रांनी मला खूप मदत केली. २०१७ मध्ये मी बाबरविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तो पोलिस ठाण्यात आलाच नाही, मात्र दुसरीकडे माझ्यावर समेट घडवून आणण्यासाठी दबाव टाकू लागले.”

हेही वाचा: Virat Fan Marriage: वचनपूर्ती निमित्त स्पेशल ‘विराट’ भेट! कोहलीचे ७१वे आंतरराष्ट्रीय शतक अन फॅन्सच्या गळ्यात लग्नाची माळ

हमिजाने माजी पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल कादिरचा मुलगा उस्मान कादिर यालाही प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून बोलावले आहे. ती म्हणाली, “२०१७ मध्ये बाबरने आपला नंबरही बदलला. त्यानंतरही ३ वर्षे ते माझा गैरफायदा घेत राहिले. २०२० मध्ये त्याने माझ्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.”

कर्णधारपदावरून दूर करा

हमिजा म्हणाली, “बाबरला जागतिक दर्जाचा खेळाडू बनण्यासाठी मी नेहमीच मदत केली. मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितले की ही बाबरची वैयक्तिक बाब आहे. ते याबाबत काहीही करू शकत नाहीत. मला त्यांना शिक्षा करायची आहे. हा माझा कायदेशीर अधिकार आहे. जोपर्यंत मला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी प्रत्येक मंचावर बाबरविरोधात आंदोलन करणार आहे. बाबरला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणीही हमिजाने पीसीबीकडे केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 12:33 IST
Next Story
विश्लेषण: हॉकीत पेनल्टी कॉर्नरच्या नियमात नव्याने बदल करण्यामागचे कारण काय?