Iftikhar Ahmed Quetta vs Peshawar:  पाकिस्तानचा स्टार फलंदाज इफ्तिखार अहमदने एका षटकात ६ षटकार मारून इतिहास रचला. इफ्तिखार आता ६ चेंडूत ६ षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध एका षटकात ६ षटकार मारले होते. पाकिस्तान सुपर लीग (PSL) पूर्वी क्वेटा आणि पेशावर यांच्यात खेळल्या जात असलेल्या प्रदर्शनीय सामन्यात इफ्तिखार अहमदने क्वेटाकडून खेळताना डावाच्या शेवटच्या षटकात सहा षटकार ठोकले. त्याचा व्हिडिओ पीसीबीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

क्वेट्टा येथील बुगती स्टेडियमवर बाबर आझम आणि सरफराज अहमद यांच्या संघांमध्ये अटीतटीचा सामना खेळला गेला. या सामन्यात बाबर पेशावर झल्मीचे कर्णधारपद भूषवत आहे, तर क्वेटा ग्लॅडिएटर्सची कमान सरफराजकडे आहे. या सामन्यात सर्फराजच्या संघाकडून खेळत असलेल्या इफ्तिखार अहमदने बाबरच्या संघाचा गोलंदाज वहाब रियाझला अशा प्रकारे हरवले की तो कदाचित कधीच विसरणार नाही. इफ्तिखारने वहाबच्या एका षटकात ६ षटकार ठोकले. वहाब रियाझ यांना अलीकडेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे कार्यकारी क्रीडा मंत्री बनवण्यात आले आहे. पीएसएलच्या या मोसमात वहाब पेशावर झल्मीकडून खेळणार आहे.

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: SRH चे फलंदाज ठरले फेल पण २० वर्षाच्या तरुणतुर्क शिलेदाराने सावरला संघाचा डाव, कोण आहे हा नितीश रेड्डी?
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Abhishek Sharma Creates History for SRH
IPL 2024 : अभिषेकने शर्माने हैदराबादसाठी रचला इतिहास! ट्रॅव्हिसला मागे टाकत केला ‘हा’ खास पराक्रम
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

असे ६ चेंडूत ६ षटकार, व्हिडिओ व्हायरल

पेशावरकडून डावाचे शेवटचे षटक आणणाऱ्या वहाब रियाझवर इफ्तिखार अहमद तुटून पडला. वहाबने त्याच्या षटकातील पहिला चेंडू लो फुल टॉसने टाकला. इफ्तिखारने हा चेंडू लेग साइडच्या दिशेने षटकार मारला. त्याच्या पुढच्या चेंडूवरही इफ्तिखारने बॅट जोरात फिरवली आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला. त्यानंतर ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर इफ्तिखारने पुन्हा एकदा बॅट स्विंग करून चेंडू सीमापार पाठवला.

चौथ्या चेंडूसाठी वहाब आपला कोन बदलतो आणि विकेटच्या आसपास येतो आणि ओव्हरचा चौथा चेंडू टाकतो. या सर्व बदलांनंतरही परिणाम तोच आहे. इफ्तिखारने हा चेंडू ऑफ साइडच्या षटकारासाठी मारला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर इफ्तिखारला षटकार षटकाचा पॉइंट मिळाला. यानंतर, ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर इफ्तिखारने एकदा बॉल प्रेक्षकांकडे पाठवला आणि वहाबच्या षटकात ६ षटकार मारले.

इफ्तिखार खानची जबरदस्त फटकेबाजी

या सामन्यात इफ्तिखार अहमदने ५० चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर क्वेटा ग्लॅडिएटर्सने बाबर आझमची टीम पेशावर झल्मीला १८५ धावांचे लक्ष्य दिले. इफ्तिखार अहमदने ५० धावा पूर्ण करण्यासाठी ४२ चेंडू खेळले. पण, क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या डावातील शेवटच्या षटकात त्याने षटकारांचा एवढा पाऊस पाडला की संपूर्ण खेळच पालटला. क्वेटा ग्लॅडिएटर्सची धावसंख्या १९ षटकांत ५ गडी गमावून १४८ धावा होती. मात्र शेवटच्या षटकात इफ्तिखारने वहाबविरुद्ध सलग ६ षटकार ठोकले. या ६ षटकारांमुळे क्वेटाची धावसंख्या २० षटकांत १८४ धावांपर्यंत पोहोचली. इफ्तिखारने अखेर ८ चेंडूत ४४ धावा ठोकल्या.

तत्पूर्वी क्वेट्टा येथील मुसा चौकात स्फोट झाला आणि त्यामुळे स्टेडियममधील लोकांमध्ये हाणामारी झाली काहीजण खूप घाबरले होते. त्यामुळे सामना अर्धा तास थांबवावा लागला होता. लोकांनी स्टेडियममध्ये दगडफेक सुरू केली. यानंतर खेळाडूंना सुरक्षित ड्रेसिंग रूममध्ये घेऊन जावे लागले. मात्र, नंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. पाकिस्तान सुपर लीगचा आठवा सीझन १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा: Test Cricket: ‘लाल बॉलचा हट्ट कशासाठी?’ कसोटी क्रिकेटमध्ये दृश्यमानतेच्या समस्येवर मात करण्यासाठी ‘हा’ बदल आवश्यक

एका षटकात ६ षटकार मारणारा फलंदाज

गॅरी सोबर्स (प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये)

रवी शास्त्री (प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये)

हर्शल गिब्स (ODI मध्ये)

युवराज सिंग (T20I)

जॉर्डन क्लार्क (2nd XI match)

किरॉन पोलार्ड (T20I)

मिसबाह-उल-हक (हाँगकाँग T20 ब्लिट्झ)

हजरतुल्ला जझाई (T20)

थिसारा परेरा (लिस्ट अ क्रिकेट)

रवींद्र जडेजा (आंतर जिल्हा टी२० स्पर्धा)

जसकरण मल्होत्रा ​​(ODI मध्ये)

लिओ कार्टर (T20)

अॅलेक हेल्स (नॅटवेस्ट टी20 ब्लास्ट)

इफ्तिखार अहमद (PSL)