VIDEO : विकेट काढली कोणी?; झिम्बाब्वे आणि बांगलादेश सामन्यातील रहस्यमय प्रकारावरुन खेळाडूही गोंधळले

भूताने विकेट काढली असल्याच्या लोकांनी दिल्या प्रतिक्रिया

bails falls without contact in zimbabwe vs bangladesh t20 match
झिम्बाब्वे वि. बांगलादेश

झिम्बाब्वे आणि बांगलादेश यांच्यातील दुसर्‍या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यादरम्यान एक भीतीदायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. या सामन्यात बांगलादेश संघाच्या फलंदाजीदरम्यान स्टंपवर असणारी बेल्स रहस्यमयरित्या खाली पडली. बांगलादेशच्या डावाच्या १८व्या षटकात मोहम्मद सैफुद्दीन फलंदाजी करत असताना ही घटना घडली. झिम्बाब्वेकडून तेंदई चतरा गोलंदाजी करत होता. सैफुद्दीन हिट विकेट झाल्यामुळे चतराने आनंद साजरा केला. पण कोणताही स्पर्श न झाल्यामुळे बेल्स कशी खाली पडली, हे पाहून सैफुद्दीन चक्रावला.

या विचित्र परिस्थितीचा शोध घेण्यासाठी पंचांनी व्हिडिओ फुटेज समोर आणले. या फुटेजमध्ये ही बेल्स आपोआप खाली पडल्याचे दिसले. सैफुद्दीन स्टंपपासून काही इंच अंतरावर होता. त्यामुळे त्याचा आणि बेल्सचा स्पर्श होणे शक्यच नव्हते. परंतु, बेल्स पडली कशी, हे रहस्य उघड होऊ शकले नाही.

 

लोकांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

 

 

 

 

 

 

नक्की घडले काय?

चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटण्यापूर्वीच फलंदाजामागचे स्टंप हलले आणि एक बेल्स खाली पडली. या दरम्यान फलंदाज यष्टीपासून बराच दूर होता. चेंडूही तिथे पोहोचलाच नव्हता. चतराने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला होता. यावर सैफुद्दीनने डीप मिडविकेटच्या दिशेने फटका खेळला. फटका खेळल्यानंतर त्याने पाहिले, की बेल्स खाली पडली आहे. हे पाहून त्यालाही आश्चर्य वाटले. पण या गोष्टीकडे अधिक लक्ष देण्याऐवजी त्याने धावण्यावर भर दिला.

या सामन्यात बांगलादेशला २३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. १६६ धावांचा पाठलाग करताना त्यांचा संघ १४३ धावांवर आटोपला. अशाप्रकारे तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशी बरोबरीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bails falls without contact in zimbabwe vs bangladesh t20 match adn

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी