भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत, 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. बजरंगने अटीतटीच्या लढाईत क्युबाच्या मल्लाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

या विजयासह बजरंग पुनियाने मानाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत स्वतःचं दुसरं पदक निश्चीत केलं आहे. याआधी 2013 साली झालेल्या स्पर्धेत बजरंगला कांस्यपदक मिळालं होतं. याआधी झालेल्या राष्ट्रकुल व आशियाई खेळांमध्ये बजरंगने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 24 वर्षीय बजरंग पुनियाकडून यंदाच्या स्पर्धेत पदकाची आशा बाळगली जात होती, या अपेक्षांवर खरं उतरत बजरंगने आपलं पदक निश्चीत केलं आहे.

भारताकडून आतापर्यंत सुशिल कुमारने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 2010 साली मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत 66 किलो वजनी गटात सुशीलने सुवर्णपदक पटकावलं होतं. त्यामुळे बजरंगने सुवर्णपदकाची कमाई केल्यास, भारतीय कुस्तीसाठी हा एक ऐतिहासीक क्षण ठरणार आहे. उपांत्य फेरीत बजरंगने आपल्या प्रतिस्पर्धी मल्लावर कशी मात केली, ते जरुर पाहा…