Scottish Women’s Premier League : भारताच्या बालादेवीचा पहिला गोल

युरोपियन क्लबचं प्रतिनिधीत्व करणारी बालादेवी पहिली महिला भारतीय खेळाडू

भारताची आघाडीची महिला फुटबॉलपटू बाला देवीने स्कॉटीश वुमन्स प्रिमीअर लिग स्पर्धेत आपल्या पहिल्या गोलची नोंद केली आहे. Rangers FC संघाकडून खेळत असताना बालादेवीने हा कारनामा केला. बालादेवीच्या Rangers FC संघाने Motherwell FC संघाचा ९-० ने धुव्वा उडवला.

६५ व्या मिनीटाला सामन्यात संधी मिळालेल्या बालादेवीने ८५ व्या मिनीटाला आपल्या संघाकडून अखेरचा गोल झळकावत आपल्या नावावर पहिल्या गोलची नोंद केली.

Rangers FC संघाकडून क्रिस्टी होवॅट आणि लिझी अर्नोट या दोन्ही खेळाडूंनी गोलची हॅटट्रीक केली. तर मेगन बेल आणि डायना बोर्मा आणि बालादेवी यांनी प्रत्येकी १-१ गोल झळकावला. ३० वर्षीय बालादेवी युरोपियन फुटबॉल क्लबचं प्रतिनिधीत्व करणारी पहिली महिला फुटबॉलपटू ठरली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bala devi scores her first goal in scottish womens premier league psd

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या