scorecardresearch

एकदिवसीय संघाचा ताळमेळ साधणे गरजेचे -द्रविड

‘‘कोणत्याही संघाचा समतोल साधण्यासाठी सहा ते आठ क्रमांकावरील खेळाडू महत्त्वाचे असतात.

केप टाऊन : हार्दिक पंडय़ा आणि रवींद्र जडेजा यांच्या अनुपस्थितीत भारताच्या एकदिवसीय संघाचा ताळमेळ बिघडल्याची कबुली मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सोमवारी दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला एकदिवसीय मालिकेत ०-३ असा दारुण पराभव पत्करावा लागला. या मालिकेत सहा ते आठव्या Rमांकावरील खेळाडूंकडून चमकदार कामगिरी न झाल्याचा भारताला फटका बसल्याचे द्रविडने सांगितले.

‘‘कोणत्याही संघाचा समतोल साधण्यासाठी सहा ते आठ क्रमांकावरील खेळाडू महत्त्वाचे असतात. कारण ते तुमच्यासाठी दुहेरी योगदान देऊ शकतात. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी आमच्याकडे तसे खेळाडू नव्हते. त्यामुळे हार्दिक पंडय़ा, रवींद्र जडेजा जेव्हा पूर्ण तंदुरुस्तीसह संघात परततील, तेव्हा आपोआप संघाचा समतोल साधला जाईल,’’ असे द्रविड म्हणाला. त्याशिवाय द्रविडने कर्णधार के. एल. राहुलचा बचाव करताना भविष्यात राहुल कर्णधार म्हणून अधिक प्रगल्भ होईल, असे मत व्यक्त केले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Balance of odi side an issue accepts head coach dravid zws

ताज्या बातम्या