scorecardresearch

Premium

इचलकरंजीचा पठ्ठ्या बनला भारतीय खो-खो संघाचा कर्णधार

बाळासाहेब पोकर्डेची गगनभरारी

इचलकरंजीचा पठ्ठ्या बनला भारतीय खो-खो संघाचा कर्णधार

१ ते १० डिसेंबरदरम्यान नेपाळमधली काठमांडू शहरात दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांचं (SAF Games) आयोजन करण्यात आलेलं आहे. या क्रीडा स्पर्धांसाठी भारताच्या राष्ट्रीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी इचलकरंजीच्या बाळासाहेब पोकार्डे याची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेबच्या या निवडीमुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सहभागी होण्याची बाळासाहेब पोकर्डेची ही तिसरी वेळ आहे.

बाळासाहेब पोकर्डे हा सामन्य कुटुंबातील खेळाडू असून, आपल्या लहानपणापासूनच्या खो-खो प्रेमाच्या जोरावर त्याने एवढी मोठी मजल मारली आहे. आपल्या याच क्रीडा नैपुण्याच्या आधारावर बाळासाहेबला शासनाच्या क्रीडा विभागात काम मिळालं आहे. बाळासाहेब व्यतिरीक्त महाराष्ट्राच्या अभिनंदन पाटील, श्रेयस राऊळ, अक्षय गणपुले  आणि सागर पोतदार या खेळाडूंचीही राष्ट्रीय संघात निवड झालेली आहे. शुक्रवारी हा संघ नेपाळला रवाना होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघात महाराष्ट्राचे वर्चस्व दिसून येत आहे.

Shivlal Jadhav
राजकारणातही ‘काका मला वाचवा’ असा आवाज…
congress workers dancing as bjpkailash vijayvargiya sings ye desh hai veer jawano ka song in indore during ganesh visarjan celebration video viral
‘ये देश है वीर जवानों का…’ भाजप नेत्याने गायलेल्या गाण्यावर गणेशविसर्जन मिरवणुकीत थिरकले काँग्रेस कार्यकर्ते; Video व्हायरल
bhandara aromira nursing college institute principal and staff abscond along with trustee after cheating case registered
भंडारा अरोमिरा नर्सिंग कॉलेज फसवणूक प्रकरण : गुन्हा दाखल होताच संस्था चालकासह प्राचार्या आणि कर्मचारी फरार
ajit-pawar-sharad-pawar-poster-in-pune
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात ‘मनोमिलनाची आस’, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची पुण्यात पोस्टरबाजी

दुसरीकडे महिला खो-खो संघातही महाराष्ट्राच्या ५ मुलींनी राष्ट्रीय संघात आपलं स्थान पक्कं केलं आहे. प्रियांका भोपी, पौर्णिमा संकपाळ, ऐश्वर्या सावंत, अपेक्षा सुतार आणि काजल भोर यांची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. दिल्लीची नसरीन शेख महिला संघाचं नेतृत्व करेल. भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम.एस.त्यागी यांनी ही निवड जाहीर केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Balasaheb pokarde from ichalkarnaji selected as kho kho captain of india in south asian games psd

First published on: 29-11-2019 at 09:49 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×