Bangladesh Captain Statement Before IND vs BAN Test Series: पाकिस्तानचा त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत २-० ने पराभव केल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला, बांगलादेश संघ भारताविरूद्ध खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. १५ सप्टेंबरला बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामने आणि तीन टी-२० सामन्यांसाठी भारतात पोहोचला, कर्णधार नझमुल हसन शांतोने येत्या आठवड्यात संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सुरुवातीच्या कसोटीसाठी बांगलादेशचा संघ रविवारी दुपारी चेन्नईला पोहोचला. या मालिकेपूर्वी शांतोने मोठे वक्तव्य केले आहे.
ढाकावरून चेन्नईला जाण्यापूर्वी शांतोने विमानतळावर पत्रकारांना सांगितले की, “ही आमच्यासाठी निश्चितच आव्हानात्मक मालिका असेल. पाकिस्तानविरुद्धच्या चांगल्या मालिकेनंतर संघाचा आणि देशातील लोकांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे. प्रत्येक मालिका ही एक संधी असते. आम्ही दोन्ही सामने जिंकण्यासाठी खेळू.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी आहे परंतु बांगलादेशच्या कर्णधाराचा असा विश्वास आहे की सामन्यातील कामगिरी रँकिंगवर अवलंबून नाही आणि त्या पाच दिवसांमध्ये त्यांचा संघ कसा कामगिरी करतो यावर सर्व अवलंबून असेल. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हसन शांतो म्हणाला की, जरी त्यांचा संघ क्रमवारीत तळाला असला तरी ते टीम इंडियाला कडवी टक्कर देण्यासाठी तयार आहेत. शांतो म्हणाला, ‘त्यांचा संघ क्रमवारीत आमच्यापेक्षा खूप पुढे आहे, पण आम्ही अलीकडे चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानविरूद्ध मालिकेत संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली. पाच दिवस चांगले खेळण्याचे आमचे ध्येय असेल.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानचा यजमान संघाचा पराभव करून नुकताच परतला. अशा स्थितीत बांगलादेशच्या खेळाडूंचे मनोबल उंचावलेले आहे. मात्र, कोणत्याही विरोधी संघाला भारतीय भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये टक्कर देणं सोप असणार नाही. पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार असून १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान असणार आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर येथे खेळवला जाईल.
हेही वाचा – Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
IND vs BAN: कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघ
नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, सय्यद खालिद अहमद, जाकर अली आनिक
IND vs BAN 1st Test: पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.