बांगलादेश ‘अव्वल १२’ फेरीसाठी पात्र

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ७ बाद १८१ धावांचे आव्हान उभे केले.

अल अमिरात : स्कॉटलंडकडून सलामीच्या लढतीत पत्करलेल्या बांगलादेशने गुरुवारी पापुआ न्यू गिनी संघावर ८४ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची ‘अव्वल १२’ फेरी गाठली. अष्टपैलू कामगिरी करणारा शाकिब अल हसन बांगलादेशच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ७ बाद १८१ धावांचे आव्हान उभे केले. कर्णधार महमुदुल्ला (२८ चेंडूंत ५० धावा) आणि शाकिब अल हसन (३७ चेंडूंत ४६ धावा) यांनी बांगलादेशच्या धावसंख्येत महत्त्वाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, पापुआ संघाचा डाव १९.३ षटकांत ९७ धावांत कोसळला. शाकिबने ४ षटकांत ९ धावांत पापुआ संघाचे चार फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १८१ (महमुदुल्ला ५०, शाकिब अल हसन ४६; असद वाला २/२६) विजयी वि. पापुआ न्यू गिनी : १९.३ षटकांत सर्व बाद ९७ (किप्लिन डोरिगा ४६*; शाकिब अल हसन४/९)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bangladesh qualifies for top 12 round akp

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या