Jos Inglis and Nahid Rana Fight: ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशने २००५ नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशने ५० षटकांअखेर ८ गडी बाद २८४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या १९१ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. शेवटी बांगलादेशने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ८६ धावांनी जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोस इंग्लिस आणि बांगलादेशचा गोलंदाजा नाहित राणा हे दोघेही आमनेसामने आले होते. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहे. असं असताना बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. २१ वर्षांनंतर विजय मिळवलेल्या विजयामुळे हा सामना ऐतिहासिक ठरला. पण आणखी एका कारणामळे हा सामना चर्चेत राहिला. ते म्हणजे नाहिद राणा आणि जोस इंग्लिस या दोघांमध्ये बाचाबाची झाली. तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना बांगलादेशकडून ११ वे षटक टाकण्यासाठी नाहिद राणा गोलंदाजीला आला. त्यावेळी जोस इंग्लिस स्ट्राईकवर होता. नाहिद राणाने टाकलेल्या चेंडूवर बॅटची कडा घेऊन जोस इंग्लिस यष्टीरक्षकाच्या हातून झेलबाद झाला. विकेट घेताच सेलिब्रेशन करताना, नाहिद राणाने मर्यादा ओलांडली. त्याने सेलिब्रेशन करताना जोस इंग्लिसला चल निघ आणि ड्रेसिंग रुममध्ये जाण्याचा इशारा केला.
नाहिद राणाने बाहेर जाण्याचा इशारा केल्यानंतर जोस इंग्लिसनेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. तो मैदान सोडून जात असताना मध्येच थांबला आणि नाहिद राणाला म्हणाला, “तू पुढच्या सामन्यात समोर ये…” , दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. हा वाद आणखी वाढणार, त्याआधी इतर खेळाडूंनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवला. जोस इंग्लिसने या डावात २५ चेंडूंचा सामना करत १९ धावांची खेळी केली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने ५० षटकांअखेर ८ गडी बाद २६४ धावा केल्या. बांगलादेशकडून मोसादेक होसेनने नाबाद ८६ धावांची खेळी केली. तर नजमुल हुसेन शांतोने ६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २६५ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरुन ग्रीनने नाबाद ५२ धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरीने ४७ धावा केल्या. ४३ वे षटक सुरु असताना पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हा सामना काही पुन्हा सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे बांगलादेशने डकवर्थ लुईस नियमानुसार हा सामना ८६ धावांनी आपल्या नावावर केला.
