बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला नमवत टी-२० मालिका केली आपल्या नावे

ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज आणि आता बांगलादेशविरुद्ध सलग टी-२० मालिका गमावल्या आहेत.

सौजन्य : रॉयटर्स

बांगलादेशने पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला टी-२० मालिकेत ४-१ अशी धूळ चारत मालिका आपल्या नावे केली आहे. बांगलादेशने प्रथमच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-२० मालिकेत विजय मिळवला आहे.  शेवटच्या सामन्यात बांगलादेशने  प्रथम फालंदाजी करताना ८ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १२२ धावा केल्या होत्या. १२२ धवांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या कोणत्याही फालंदाजाला खेळपट्टीवर तग धरता आले नाही. १३.४ षटकांचा सामना करत ऑस्ट्रेलिया संघ फक्त ६२ धावा करू शकला. कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक २२ धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचे तब्बल ९ फलंदाज १० चा आकडा देखील पार करू शकले नाहीत. शाकिब अल हसनने बांगलादेशकडून सर्वाधिक बळी घेतले. त्याने ४ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज आणि आता बांगलादेशविरुद्ध सलग टी-२० मालिका गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी तसेच गोलंदाजी अतिशय सुमार झाली. बांगलादेशसंघाच्या सलामीच्या जोडीने ४२ धावा केल्या होत्या, परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे बांगलादेश भागीदारी करण्यात अपयश आले.

या अगोदर ऑस्ट्रेलिया संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत एकदाही १५०च्या वर धावा केल्या नाहीत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ही चिंतेची बाब मानली जात आहे. या अगोदर ऑस्ट्रेलियाने एकही टी-२० वर्ल्डकप आपल्या नावे केलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bangladesh vs australia twenty twenty series cricket sports marathi news ssh

ताज्या बातम्या