बांगलादेश की ओमान?

दुसऱ्या लढतीत आर्यलड आणि नेदरलँड यांच्यात विजयाने स्पध्रेतून निरोप घेण्यासाठी चुरस रंगणार आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेच्या साखळी फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी रविवारी बांगलादेश आणि ओमान एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. या सामन्यातील विजयी संघाला साखळी फेरीत जाण्याची संधी असेल. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल. दुसऱ्या लढतीत आर्यलड आणि नेदरलँड यांच्यात विजयाने स्पध्रेतून निरोप घेण्यासाठी चुरस रंगणार आहे.

आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पध्रेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या बांगलादेशची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात नेदरलँडविरुद्ध विजय मिळवला होता, परंतु दुसऱ्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे त्यांना आर्यलडविरुद्ध एक-एक गुण वाटून घ्यावा लागला.  मात्र, पहिल्यांदाच विश्वचषक स्पध्रेत सहभागी होणाऱ्या ओमानने पहिल्याच सामन्यात आर्यलडला नमवून इतरांना दखल घेण्यास भाग पाडले आहे

सामन्याची वेळ :

सायं. ३.३० वाजल्यापासून

प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bangladesh vs oman t20 world cup 2016 qualifier