बार्सिलोनाचा इबारवर विजय

बार्सिलोनाचा संघ अव्वल स्थानी असलेल्या रिअल माद्रिदच्या दोन गुणांनी मागे आहेत.

बार्सिलोनाचा ल्युइस सुआरेझ चेंडूवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असताना. 

सुरेख सांघिक प्रदर्शनाच्या बळावर बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉल स्पर्धेत इबार संघावर ४-० असा विजय मिळवला. या विजयामुळे बार्सिलोनाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बार्सिलोनाचा संघ अव्वल स्थानी असलेल्या रिअल माद्रिदच्या दोन गुणांनी मागे आहेत.

बार्सिलोनातर्फे डेनिस सुआरेझ, लिओनेल मेस्सी, ल्युइस सुआरेझ आणि नेयमार यांनी प्रत्येकी एक गोल केला.

अन्य लढतीत सेव्हिलाने ओसास्युनावर ४-३ असा निसटता विजय मिळवला. सेव्हिलातर्फे इबोराने ४३ आणि ६५व्या मिनिटाला गोल केले. फ्रान्को व्हॅझक्युझ आणि पाब्लो सराबिआ यांनी प्रत्येकी एक गोल केला. ओसास्युनाकडून सर्जिओ लिऑन आणि केनन कोड्रो यांनी प्रत्येकी एक गोल केला. सेव्हिलाच्या इबोराने स्वयंगोल केल्याने ओसास्युनाच्या खात्यात गोलची भर पडली.

अ‍ॅथलेटिक क्लब आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद यांच्यातील लढत २-२ बरोबरीत सुटली. अ‍ॅथलेटिकतर्फे लेक्युई आणि डी मार्कोस यांनी प्रत्येकी एक गोल केला तर अ‍ॅटलेटिकोकडून कोके आणि अँटोनिओ ग्राइझमन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Barcelona in la liga

ताज्या बातम्या