ला लिगा फुटबॉल स्पर्धा : नेयमारची कमाल, बार्सिलोनाची धमाल

अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पेनेल्टीच्या संधीचे सोने करता आले नसले तरी बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेमध्ये लेव्हांटे संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला.

अर्जेटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला पेनेल्टीच्या संधीचे सोने करता आले नसले तरी बार्सिलोनाने ला लिगा स्पर्धेमध्ये लेव्हांटे संघावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. नेयमारने सलामीचा गोल करीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या १२व्या मिनिटाला मेस्सीकडून पेनेल्टीची संधी हुकली, पण इव्हान रॅकिटिकने दुसरा गोल लगावला आणि मध्यतंरापर्यंत बार्सिलोनाकडे २-० अशी आघाडी होती. दुसऱ्या सत्रामध्ये सँड्रो रामिरेझ, प्रेडो रॉड्रिगेझ आणि मेस्सी यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Barcelona thrash 1 man levante 5