LSG vs KKR: आयपीएल २०२६ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघामध्ये झालेल्या अंगकृष रघुवंशीच्या विकेटमुळे जोरदार चर्चेत राहिला. फटका मारताच धाव घेण्याचा प्रयत्न केला, परत माघारी येत असताना तो डाईव्ह मारून क्रिझमध्ये पोहोचला. पण अंपायरने त्याला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमानुसार बाद घोषित केलं. या विकेटवरून चांगलाच वाद पेटला. अंगकृष रघुवंशीने रागात हेल्मेट फेकलं आणि बॅट आपटली. तर अभिषेक नायर अंपायरसोबत वाद घालताना दिसून आला. अनेकांना हा निर्णय चुकीचा वाटला. दरम्यान आयपीएल स्पर्धेत असे किती फलंदाज आहेत ज्यांना ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमानुसार बाद घोषित करण्यात आलं आहे? जाणून घ्या.

१) युसुफ पठाण

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डमुळे बाद होणारा पहिला फलंदाज युसूफ पठाण आहे. २०१३ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात फलंदाजी करत असताना युसुफ पठाणने फटका मारताच धाव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गोलंदाजी करत असलेल्या पार्नेलने चेंडू अडवण्यासाठी धाव घेतली. नेमकं तेव्हाच, युसुफ पठाणने चेंडू पायाने ढकलला. त्यामुळे त्याला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमानुसार बाद घोषित करण्यात आलं होतं.

२) अमित मिश्रा

अमित मिश्रा ज्या पद्धतीने बाद झाला, त्या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. २०१९ मध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान शेवटच्या षटकात धाव घेताना अमित मिश्रा खेळपट्टीच्या मधून धावताना दिसून आला होता. खलील अहमदने थ्रो केला, त्यावेळी चेंडू अमित मिश्राच्या पाठीवर जाऊन लागला होता. स्टंपच्या समोर असल्याने त्याला बाद घोषित करण्यात आलं होतं.

३) रवींद्र जडेजा

राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा देखील ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमामुळे बाद झाला होता. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा स्टंपच्या समोर धावत होता. त्यावेळी संजू सॅमसनने थ्रो केला. पण चेंडू रवींद्र जडेजाला जाऊन लागला. स्टंपच्या समोर असल्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केलं.

४) अंगकृष रघुवंशी

आता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात अंगकृष रघुवंशीला ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड नियमानुसार बाद करण्यात आलं आहे.