बायर्न म्युनिचने इन्ट्रॅचॅट फ्रँकफर्टवर १-० असा विजय मिळवत २३ वेळा बुंडेसलिगा फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. जर्मनीच्या बॅस्टियन श्वाइनस्टायगरने निर्णायक गोल करत बायर्न म्युनिचला शानदार विजय मिळवून दिला. स्पर्धेतील २८ सामन्यांमध्ये श्वाइनस्टायगरचा हा २४वा गोल ठरला. मे २०१० नंतरचे बायर्न म्युनिचचे हे पहिलेच मोठे जेतेपद आहे.
बायर्नचे स्पर्धेतले सहा सामने शिल्लक असून, २० गुणांच्या आघाडीसह त्यांनी भक्कमपणे अव्वलस्थान राखले आहे.
चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बायर्न म्युनिचसमोर बुधवारी ज्युवेन्ट्सचे आव्हान आहे. बायर्न म्युनिचच्या डेव्हिड अलाबाने २६व्या मिनिटाला पेनल्टीची संधी वाया घालवली. परंतु श्वाइनस्टायगरच्या गोलमुळे बायर्न म्युनिचने गोलांचे खाते उघडले.
अन्य सामन्यांत, बोरूसिया डॉर्टमंडने ऑग्सबर्गला ४-२ असे नमवले. मात्र तरीही ते बायर्न म्युनिचला जेतेपदापासून रोखू शकले नाहीत.