scorecardresearch

VIDEO : अर्रर्र..! विजेतेपदाचं सेलिब्रेशन करताना ‘स्टार’ क्रिकेटरचं फुटलं नाक; भळाभळा वाहू लागलं रक्त!

पर्थ स्कॉर्चर्सनं बिग बॅश लीग २०२१-२२चं विजेतेपद पटकावलं.

bbl jhye richardson cops a nasty blow on the nose during post match celebrations
BBL विजेतेपद साजरं करताना झाय रिचर्डसनला दुखापत झाली.

पर्थ स्कॉर्चर्सने बिग बॅश लीग २०२२चे विजेतेपद पटकावले. पर्थचे हे चौथे विजेतेपद ठरले. विजेतेपदासह पर्थ संघाने दणक्यात सेलिब्रेशन केले. अंतिम सामन्यात पर्थने सिडनी सिक्सर्सचा ७९ धावांनी पराभव केला. त्यानंतर पर्थने इतका जोरात विजय साजरा केला, की यादरम्यान त्यांचा खेळाडू झाय रिचर्डसनचे नाक फुटले आणि त्याचा चेहराही रक्ताने माखला.

सेलिब्रेशनदरम्यान रिचर्डसनच्या नाकाला दुखापत झाली. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागले. रिचर्डसनच्या दुखापतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो दुखापतीनंतरही हसताना दिसत आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीला आलेल्या पर्थ स्कॉर्चर्सने कर्णधार अॅश्टन टर्नर आणि लॉरी इव्हान्सच्या शानदार खेळीमुळे सिक्सर्ससमोर विजयासाठी १७२ धावांचे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा – IPL 2022 : ‘बेबी एबी डिव्हिलियर्स’ची मेगा ऑक्शनमध्ये एन्ट्री..! ‘या’ संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक

सिडनी सिक्सर्सचा संघ १६.२ षटकांत ९२ धावांत गारद झाला. पर्थ स्कॉर्चर्स हा सर्वाधिक बीबीएल जेतेपदे जिंकणारा संघ बनला आहे. पर्थसाठी ७६ धावांची खेळी करणाऱ्या लॉरी इव्हान्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर बेन मॅकडरमॉट हा मालिकावीर ठरला. रिचर्डसनने २ बळी घेतले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bbl jhye richardson cops a nasty blow on the nose during post match celebrations adn