scorecardresearch

Premium

Asia Cup 2023 पूर्वी बांगलादेशच्या अडचणी वाढल्या, श्रीलंकेला रवाना होणाऱ्या संघात ‘हा’ खेळाडू होणार नाही सहभागी

Bangladesh Cricket Board: आशिया चषक स्पर्धेत बांगलादेश आपल्या मोहिमेची सुरुवात ३१ ऑगस्टपासून करणार आहे. त्यांचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी संघाच्या अडचणीा वाढल्या आहेत.

Liton Das Sick
बांगलादेशचा क्रिकेट संघ (फोटो-संग्रहित छायाचित्र लोकसत्ता)

Liton Das will not be part of the Bangladesh tour to Sri Lanka: आशिया चषक २०२३ स्पर्धा ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान हायब्रीड मॉडेल अंतर्गत श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. बांगलादेशचा स्टार फलंदाज लिटन दास आजारपणामुळे २०२३ आशिया चषकासाठी श्रीलंकेला जाणाऱ्या बांगलादेशी संघाचा भाग असणार नाही. याबाबत बीसीबीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा बांगलादेश संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

बांगलादेश गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध ३१ ऑगस्ट रोजी कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, बांगलादेशचा गद्दाफी स्टेडियमवर ३ सप्टेंबर रोजी त्यांच्या अंतिम गट टप्प्यातील सामना अफगाणिस्तानशी होईल. बांगलादेशचा संघ २७ ऑगस्टला ढाका येथून श्रीलंकेला रवाना होणार आहे. दुखापतग्रस्त इबादत हुसेनच्या जागी नुकताच संघात समाविष्ट केलेला युवा वेगवान गोलंदाज तनझिम हसन शाकिब हा देखील संघासोबत प्रवास करणार नाही. त्याचे तिकीट अद्याप निश्चित झालेले नसल्यामुळे तो नंतर यजमान देशात जाईल.

Video of umpire in Sindh Premier League goes viral
SPL 2024 : अंपायरने अपील न होताच फलंदाजाला केले बाद घोषित, पाकिस्तानमधील सामन्यातील VIDEO होतोय व्हायरल
India dominated the first day of India first Test match against England
पहिल्या दिवशी भारताचा दबदबा! फिरकीपटूंनी इंग्लंडला २४६ धावांत रोखले; यजमानांच्या १ बाद ११९ धावा
shoaib bashir
पाकिस्तानी वंशाचा इंग्लंडचा फिरकीपटू शोएब बशीर व्हिसाअभावी परतला मायदेशी; पदार्पण लांबणीवर
Pakistan hockey Team Coach Shahnaz Sheikh
Shahnaz Shaikh : पाकिस्तानच्या हॉकी कोचने ऑलिम्पिक पात्रता फेरीतील पराभवासाठी खराब अंपायरिंगला धरले जबाबदार

बीसीबीच्या डॉक्टरांनी लिटन दास बाबत मोठं वक्तव्य केलं –

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) क्रिकेट सुकाणू समितीचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी रविवारी २७ ऑगस्ट रोजी लिटनच्या अनुपलब्धतेची पुष्टी केली. डेली स्टारने जलाल यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “लिटनचा ताप उतरला आहे. त्यांची डेंग्यू चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे तो लवकर बरा झाला, तर तो पुढील विमानाने श्रीलंकेला जाणार आहे. पण जर तो बरा झाला नाही, तर आम्हाला त्याच्या बदलीचा विचार करावा लागेल.”

हेही वाचा – Asia Cup 2023: युजवेंद्र चहलची टीम इंडियात निवड न झाल्याने एबी डिव्हिलियर्स निराश; म्हणाला, “युजी नेहमीच खूप…”

बीसीबीचे मुख्य चिकित्सक देबाशीष चौधरी म्हणाले की, यष्टीरक्षक-फलंदाजाचा आजार गंभीर नाही आणि तो लवकरात लवकर संघात सामील होईल. ते म्हणाले, “लिटनला ताप आहे. पण ही काही गंभीर बाब नाही. सर्व चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तो बरा झाल्यानंतर संघात सामील होईल.”

हेही वाचा – Asian Games स्पर्धेसाठी VVS Laxman सांभाळणार भारतीय पुरुष संघाची धुरा, तर ऋषिकेश कानिटकरकडे महिला संघाची जबाबदारी

दुसरीकडे, संघाचा वेगवान गोलंदाज तस्किन अहमद याने आशिया चषकाबाबत सांगितले की, बांगलादेशला स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळण्याची आशा आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळल्याने आपल्या संघाला भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी खूप मदत होईल, असा विश्वास या वेगवान गोलंदाजाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bcb informed liton das will not be part of the bangladesh tour to sri lanka for asia cup 2023 vbm

First published on: 27-08-2023 at 15:09 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×