BCCI appointed Anil Patel as the manager of Team India: भारतीय क्रिकेट संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (डब्ल्यूटीसी फायनल २०२३) खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया यावेळी चॅम्पियन होण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ७ जूनपासून ओव्हलवर अंतिम फेरीत भिडतील. या बहुप्रतिक्षित सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठी घोषणा केली आहे. भारताने टीम इंडियासाठी एक व्यवस्थापक नियुक्त केला आहे, ज्याचा यशाचा दर १०० टक्के आहे.

बीसीसीआयने डब्ल्यूटीसी फायनल २०२३ साठी टीम इंडियाचे व्यवस्थापक म्हणून अनिल पटेल यांची नियुक्ती केली आहे. अनिल पटेल हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत. याआधी ते टीम इंडियाचे मॅनेजरही होते. पटेल हे २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. अनिल पटेल व्यवस्थापक पदावर असताना टीम इंडियाने ९ मालिका खेळल्या आणि टीम इंडियाने सर्व मालिका जिंकल्या. म्हणजे पटेल यांच्या यशाचे प्रमाण दर १०० टक्के आहे.

Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Why is Smriti Mandhanas success in WPL important for Indian cricket
विश्लेषण : स्मृती मनधानाचे ‘डब्ल्यूपीएल’मधील यश भारतीय क्रिकेटसाठी का महत्त्वाचे?
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

भारताने १० कसोटी सामने जिंकत गाठली अंतिम फेरी –

टीम इंडियात भाग असलेले सर्व खेळाडू २९ मे पर्यंत इंग्लंडला पोहोचतील. सध्या भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत. भारतीय संघ १८ सामने खेळून भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. या काळात टीम इंडियाने १० कसोटी जिंकल्या. त्याचबरोबर 5 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला, तर ३ कसोटी सामने अनिर्णित राहिले. भारतीय संघाला गेल्या वेळी न्यूझीलंडकडून फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. यावेळी टीम इंडियाला जुन्या चुकांची पुनरावृत्ती करायला आवडणार नाही.

हेही वाचा – LSG Team: लखनऊ सुपर जायंट्स संघात नवीन खेळाडूची एन्ट्री! जयदेव उनाडकटच्या जागी मुंबईच्या युवा खेळाडूला मिळाली संधी

डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ:

विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, उमेश यादव, जयदेव उनाडकट मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.