बीसीसीआय लवकरच नवीन हंगामासाठी केंद्रीय करार मिळवणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करू शकते. गतवर्षी ४ गटात एकूण २८ खेळाडूंना स्थान देण्यात आले होते. यावेळीही यादीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. पण केएल राहुल आणि ऋषभ पंत यांना बढती मिळू शकते. दुसरीकडे, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे वरिष्ठ खेळाडू सध्याच्या श्रेणीतून बाहेर पडू शकतात. दोघांच्या कामगिरीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआय A+, A, B आणि C अशा श्रेणीनुसार खेळाडूंना केंद्रीय करार देते. A+ श्रेणीत वार्षिक ७ कोटी, A श्रेणीत ५ कोटी, B श्रेणीत ३ कोटी तर C श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतात. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले, “साहजिकच सर्व फॉरमॅटमधील तीन महत्त्वाचे खेळाडू – रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह A+ श्रेणीमध्ये राहतील. पण केएल राहुल आणि ऋषभ पंतही आता सर्व फॉरमॅटमध्ये नियमित खेळाडू म्हणून स्वत:ला प्रस्थापित करत आहेत. त्यामुळे या दोघांना बढती मिळते की नाही हे पाहावे लागेल.”

हेही वाचा – अरेरे..! पैसे न मिळाल्यामुळं सचिन तेंडुलकरला घ्यावा लागला ‘मोठा’ निर्णय; वाचा नक्की झालं काय?

”गेल्या हंगामातील कामगिरीच्या आधारे तुम्ही कुठे आहात हे केंद्रीय करार दाखवते. बीसीसीआय आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रहाणे आणि पुजारा यांना सन्मानपूर्वक अ श्रेणीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला, तर तो वेगळा मुद्दा आहे, परंतु सामान्य परिस्थितीत ते या श्रेणीत असू शकत नाहीत.”

गेल्या हंगामातील खेळाडूंचा करार

  • A+ श्रेणी: विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
  • A श्रेणी: रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या.
  • B श्रेणी: ऋद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, मयंक अग्रवाल.
  • C श्रेणी: कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुबमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, यजुर्वेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci central contracts will ajinkya rahane cheteshwar pujara retain their grade adn
First published on: 20-01-2022 at 20:37 IST