BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management : न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत ०-३ अशा लाजिरवाण्या पराभवामुळे अत्यंत नाराज झालेल्या बीसीसीआयने अखेर टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला खडे बोल सुनावले आहेत. अलीकडेच, टीम इंडिया किवी संघाविरुद्ध एकही कसोटी जिंकू शकली नाही आणि ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेतील प्रत्येक सामना हरला. या पराभवानंतर पाच दिवसांनी बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापन यांच्यात बैठक पार पडली.

बीसीसीआयची पार पडली ६ तासांची बैठक –

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांच्यासमोर हजर झाले, जिथे पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली आणि ३ सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांच्याकडून उत्तरे मागवण्यात आली.मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत तीन दिवसांतच टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतरच बोर्ड या धक्कादायक कामगिरीवर प्रशिक्षक आणि कर्णधाराला प्रश्न विचारणार असल्याची बातमी आली. ही बैठक शुक्रवार, ८ नोव्हेंबर रोजी झाली, ज्यामध्ये गंभीर आणि रोहित व्यतिरिक्त निवड समिती प्रमुख आगरकर देखील उपस्थित होते.

Australia A beat India A by 6 Wickets in in 2nd unofficial Test
IND A vs AUS A : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी भारताची उडाली दाणादाण, दुसऱ्या सराव सामन्यातही हार
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
IND vs SA India National Anthem Witnesses Technical Glitch Ahead Of 1st T20I vs South Africa
IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Statement About Rohit Sharma Misses 1st Test Said If Your wife is going to have a baby IND vs AUS
Rohit Sharma: “रोहितला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी थांबायचे असेल…”, हिटमॅनबद्दलच्या वक्तव्यावर आरोन फिंचने गावस्करांना दिले चोख प्रत्युत्तर
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!

या प्रश्नांवर मागितली उत्तरं –

वृत्तसंस्था पीटीआयने बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेली ही आढावा बैठक ६ तासांची होती, ज्यामध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सामील झाला होता. पीटीआयच्या वृत्तात सांगण्यात आले आहे की, या बैठकीत संपूर्ण मालिकेदरम्यान संघ व्यवस्थापनाने घेतलेल्या अशा काही निर्णयांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर बरीच चर्चा झाली, त्यापैकी एक मुंबई कसोटी खेळपट्टी आणि दुसरा म्हणजे जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्याचा. पहिल्या दोन कसोटीत पराभूत होऊनही उपकर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आल्याने बोर्डाचे अधिकारी नाराज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी, या बैठकीत खेळपट्टीचा प्रश्नही विचारण्यात आला, जो असाही संपूर्ण देशातील क्रिकेट चाहते विचारत होते. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही फिरकीला अनुकूल खेळपट्टी होती, त्यात भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. अशा परिस्थितीत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी रोहित आणि गंभीरला ‘रँक टर्नर’ (पहिल्याच दिवसापासून अधिक टर्न घेणारी खेळपट्टी) का केली? पुणे कसोटीत मिचेल सँटनरने १३, तर एजाज पटेलने मुंबई कसोटीत ११ विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – IND vs SA सामन्यापूर्वी अचानक काही सेकंदात बंद झाले भारताचे राष्ट्रगीत, मग पुढे काय झालं? जाणून घ्या

गौतम गंभीरच्या कोचिंगवर चर्चा –

या सर्वांशिवाय तिसरा महत्त्वाचा मुद्दा ज्यावर चर्चा झाली, तो म्हणजे गौतम गंभीरची कोचिंग स्टाईल. अहवालानुसार, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरच्या कोचिंग स्टाईलवर प्रश्न उपस्थित केला नाही पण त्याच्या पद्धतींवर नक्कीच चर्चा झाली. एवढेच नाही तर संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक गौतम गंभीरचे काही सदस्य एकाच पानावर नाहीत, म्हणजेच त्यांच्यात मतभेद असल्याचेही या बैठकीतून समोर आले आहे. यासोबतच टीम व्यवस्थापनाच्या तीन महत्त्वाच्या लोकांना ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये टीमला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांची काय योजना आहे? हेही विचारण्यात आले.

Story img Loader