scorecardresearch

Premium

IND vs SA : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल, डोक्यावर बॅगा घेऊन धावताना दिसले खेळाडू! बीसीसीआयने शेअर केला VIDEO

India vs South Africa T20 Series : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ आफ्रिकेत पोहोचला आहे. बीसीसीआयने खेळाडूंचा प्रवास दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

India vs South Africa T20 Series Updates in marathi
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत दाखल (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

BCCI has shared a video of Team India arriving in South Africa : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेला १० डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत दोन्ही संघात तीन टी-२० सामने खेळले जाणार आहेत. यानंतर तीन ३ एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. यासाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. या संघात भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार्‍या भारतीय संघात प्रामुख्याने युवा खेळाडूंचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बीसीसीआयने याचा व्हिडिओही शेअर केला आहे.

डोक्यावर बॅग घेऊन खेळाडूंना का धावावे लागले?

बीसीसीआयने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडूंचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या दौऱ्यात सर्व खेळाडू खूप मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला, तेव्हा तिथे पाऊस पडत होता. यावेळी खेळाडू डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले. विमानतळावर उतरल्यानंतर खेळाडू बसमध्ये जाण्यासाठी भिजण्यापासून वाचण्यासाठी डोक्यावर बॅग घेऊन धावताना दिसले. या मालिकेचे नेतृत्व भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव करणार आहे. अशा परिस्थितीत सूर्यासाठी ही मालिका एखाद्या मोठ्या परीक्षेपेक्षा कमी असणार नाही.

mumbai vs assam ranji trophy match shardul's 6 wickets
शार्दुल ठाकूरचे शानदार पुनरागमन! अवघ्या २१ धावात ६ विकेट्स घेत प्रतिस्पर्धी संघाचा डाव लंच ब्रेकपूर्वीच गुंडाळला
Umpire stops Australia Wicket celebrations no appeal For run out Rule For Not Out AUS vs WI T20I Highlights Second Win After IND vs AUS
ऑस्ट्रेलियाचं सेलिब्रेशन पंचांनी थांबवलं; बाद असूनही ‘त्याला’ घोषित केलं नाबाद, क्रिकेटचा हा नियम काय सांगतो?
funny video of the umpire in the Australia vs South Africa women's
AUSW vs SAW : आऊट की नॉट आऊट? आंतरराष्ट्रीय सामन्यात महिला अंपायरचा उडाला गोंधळ, VIDEO व्हायरल
U19 World Cup 2024 Updates in marathi
U19 WC 2024 final: भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार अंतिम सामना? टीम इंडियाला मिळणार १८ वर्षांपूर्वीचा बदला घेण्याची संधी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना १० डिसेंबर रोजी होणार आहे. दुसरा सामना १२ डिसेंबरला तर तिसरा सामना १४ डिसेंबरला होणार आहे. त्याचवेळी, तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना १७ डिसेंबर रोजी होणार आहे, दुसरा सामना १९ डिसेंबर रोजी आणि तिसरा सामना २१ डिसेंबर रोजी होणार आहे. याशिवाय भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकमेव कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – LLC 2023 : “मैदानावर त्याने जे शब्द वापरले, ते मी…”, गौतम गंभीरशी झालेल्या वादावर श्रीसंतने दिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

राहुल द्रविडने सांगितला टीम इंडियचा गेम प्लॅन –

या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप कठीण आहे, अशा परिस्थितीत आम्ही सर्वांना एकसारखे खेळण्यास सांगू शकत नाही. यासाठी सर्व खेळाडूंना स्वतंत्र दिले जाईल, जेणेकरून ते त्यांच्या सोयीनुसार संघासाठी योगदान देऊ शकतील.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bcci has shared a video of team india arriving in south africa to play t20 odi and test series vbm

First published on: 07-12-2023 at 12:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×