भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नवीन हंगामाच्या आधी अनेक नियमांत बदल केले आहेत. ‘डीआरएस’ ते सुपर ओव्हर यासारख्या नियमांमध्ये झालेल्या बदलामुळे यंदाचा हंगाम आणखी रोमांचक होणार आहे.

‘आयपीएल’च्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे. ‘बीसीसीआय’ने करोनाविषयक तसेच डीआरएस आणि सुपर ओव्हरसारख्या नियमांचा समावेश केला आहे.

Indian Premier League Cricket Mumbai vs Chennai ipl 2024 match sport news
इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: मुंबई-चेन्नई आमनेसामने! पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत आज वानखेडेवर होणाऱ्या द्वंद्वात धोनीवर लक्ष
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद

नवे करोना नियम

‘बीसीसीआय’ने सर्वात मोठा बदल हा खेळण्यानुरूप वातावरणाशी संबंधित नियमात केला आहे. करोना प्रादुर्भाव वाढल्यास (खेळाडूला करोनाची लागण झाल्यास किंवा लागण झालेला खेळाडू इतरांच्या संपर्कात आल्यास) १२ तंदुरुस्त खेळाडूंचा संघ (सात भारतीय खेळाडूंचा समावेश) उपलब्ध नसेल तर, ‘बीसीसीआय’ सामन्याच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करेल. तसे शक्य न झाल्यास ’आयपीएल’ची तांत्रिक समिती याबाबत अंतिम निर्णय घेईल.

प्रत्येक डावात संघांना दोन डीआरएस

मेरिलिबोन क्रिकेट क्लबकडून (एमसीसी)  सुचविण्यात आलेल्या नियमाला पाठिंबा देत ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ सामन्यात एकूण चार ‘डीआरएस’चा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे प्रत्येक डावात दोन्ही संघांना दोन-दोन ‘डीआरएस’चा वापर करता येणार आहे.

झेलनंतर नवीन फलंदाज फलंदाजीला

‘बीसीसीआय’ने मेरिलिबोन क्रिकेट क्लबने झेलसंदर्भात केलेला नियम यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये अमलात आणायचे ठरवले आहे. या नवीन नियमानुसार कोणताही फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज फलंदाजी करील. पण, झेल षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घेतल्यास मात्र नवा फलंदाज समोरील बाजूला उतरेल.

सुपर ओव्हर टायझाल्यानंतरही विजेता

‘आयपीएल’साठीच्या नवीन सुपर ओव्हर नियमात बदल केल्याने संघाच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. नवीन नियमानुसार जर प्ले-ऑफ किंवा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्येदेखील ‘टाय’ (बरोबरीत) राहिला किंवा अडचणीच्या परिस्थितीत सुपर ओव्हर होऊ शकली नाही तर, साखळी फेरीच्या सामन्यांनुसार गुणतालिकेत वरचढ असलेला संघ विजेता ठरणार आहे. याचा अर्थ अंतिम फेरीतील दोन संघामधील जो संघ साखळीच्या गुणतालिकेत चांगल्या स्थितीत असेल, त्याला विजेता घोषित करण्यात येणार आहे.