भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून पायउतार होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त, बोर्ड सचिव जय शाह यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर २०२२ मध्ये संपणार आहे. अशा स्थितीत या दोघांच्या जागी बोर्डाचा नवा अध्यक्ष आणि सचिव नेमला जातो की गांगुली-शहा यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ऑक्टोबर-२०१९ मध्ये गांगुलीला बीसीसीआयचा अध्यक्ष बनवण्यात आले, त्याआधी तो बंगाल क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होता.
सौरव गांगुली २०१५ पासून बंगाल क्रिकेट असोसिएशनशी संबंधित होता. न्यूज १८ हिंदीच्या वृत्तानुसार, त्याचा कार्यकाळ या वर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार आहे. अशा स्थितीत मंडळाला नवा अध्यक्ष मिळू शकतो. गांगुलीच्या अध्यक्षपदाखाली भारताने अनेक द्विपक्षीय मालिकेतही यश संपादन केले.
हेही वाचा – Test Captaincy सोडण्यापूर्वी BCCIनं विराटला दिली होती ‘अशी’ ऑफर..! वाचा कोहलीनं दिलेलं उत्तर
गांगुलीच्या कार्यकाळातच राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण नव्या इंनिंगसाठी सज्ज झाले. द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) प्रमुख म्हणून बंगळुरूमध्ये काम करत होता, त्यानंतर गांगुलीने त्याला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी घेण्यास राजी केले. याशिवाय, गांगुलीने लक्ष्मणशीही बोलून त्याला NCAमध्ये सामील होण्यासाठी राजी केले.