नवी दिल्ली : रोहित शर्माने कर्णधार म्हणून एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळामधील (बीसीसीआय) प्रमुख पदाधिकारी समाधानी आहेत. त्यामुळे रोहितचे कर्णधारपद तूर्तास तरी धोक्यात नसल्याचे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या कामगिरीचे पुनरावलोकन करण्यासाठी ‘बीसीसीआय’ची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. या बैठकीला ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह, कर्णधार रोहित, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा उपस्थित होते.

Manoj Tiwary's statement on Shivam Dube
Team India : ‘विश्वचषकासाठी शिवम दुबेची निवड न झाल्यास CSK जबाबदार असेल..’ भारताच्या माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

या बैठकीत भारतीय संघाच्या गेल्या वर्षांतील कामगिरीसह या वर्षी मायदेशात होणारी एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. हार्दिक पंडय़ाकडे ट्वेन्टी-२० संघाचा पुढील कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी ट्वेन्टी-२० मालिकेसाठीही भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा हार्दिककडे सोपवण्यात आली आहे. मात्र, पुढील ट्वेन्टी-२० विश्वचषक २०२४मध्ये होणार आहे. त्यामुळे रविवारी झालेल्या बैठकीत ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदाबाबत चर्चा करण्यात आली नाही. 

‘‘कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करतो आहे. क्रिकेटच्या या दोन प्रकारांत कर्णधार म्हणून रोहितच्या भवितव्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचे कर्णधारपद सुरक्षित आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

तसेच या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने आता संघबांधणीला सुरुवात होणार आहे. आता केवळ २० खेळाडूंवर लक्ष केंद्रित करून त्यांनाच संधी देण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला.

या बैठकीला चेतन शर्मा यांची उपस्थिती ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. गेल्या वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारतीय संघाच्या अपयशानंतर शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर शर्मा यांनी निवड समितीत स्थान मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज केला. ते रविवारी झालेल्या बैठकीला उपस्थित राहिल्याने निवड समितीचे अध्यक्षपद पुन्हा त्यांनाच मिळण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘‘वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेशिवाय चेतन शर्मा निवड समितीतील स्थानासाठी पुन्हा अर्ज करणार नाहीत. त्यांना निवड समितीत पुन्हा स्थान मिळण्याचे संकेत आहेत. एकदिवसीय विश्वचषकाला

आता केवळ १० महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. चेतन आणि हरविंदर हे दोघे निवड समितीत कायम राहणे सोयीचे ठरेल. अन्य तीन पदांवर नवे उमेदवार निवडले जाण्याची शक्यता आहे,’’ असेही सूत्रांनी सांगितले.

निवडीसाठी पुन्हा यो-यो चाचणीचा निकष

भारतीय संघात निवडीसाठी यो-यो तंदुरुस्ती चाचणी आणि डेक्सा (हाडांची चाचणी) हेसुद्धा निकष असणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने रविवारी जाहीर केले. मुंबईत झालेल्या पुनरावलोकन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच गेल्या काही वर्षांत देशातील उदयोन्मुख खेळाडू ‘आयपीएल’चा विचार करून केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, आता भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व स्पर्धात जास्तीतजास्त सामने खेळणे अनिवार्य असल्याचे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे एकदिवसीय विश्वचषक आणि अन्य मालिकांचा विचार करून ‘आयपीएल’मधील संघांना भारतीय खेळाडूंना अधूनमधून विश्रांती देण्याची सूचना करण्यात येणार आहेत. ‘आयपीएल’ संघ ‘एनसीए’सोबत मिळून खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवतील.