T20 World Cup: धोनीच्या निवडीनंतर दुसऱ्याच दिवशी वादाला सुरुवात; BCCI कडे धोनीविरोधात लेखी तक्रार

बुधवारीच धोनीची टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र आता ही नियुक्ती नियमांमध्ये अडकण्याची शक्यता.

Dhoni
कालच धोनीची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाली (प्रातिनिधिक फोटो सौजन्य ट्विटरवरुन साभार)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडे महेंद्र सिंह धोनीविरोधात तक्रार करण्यात आली आहे. हितसंबंधांचा संघर्ष म्हणजेच कॉनफ्लिक्ट ऑफ इन्ट्रेस्टच्या नियमांअंतर्गत ही तक्रार करण्यात आली आहे. बुधवारीच धोनीची टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मेंटॉर म्हणजेच मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र आता ही नियुक्ती नियमांमध्ये अडकण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या सर्वेच्च समितीला यासंदर्भात लेखी पत्र देत तक्रार केल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> T20 World Cup: निवृत्तीनंतरही टीम इंडियामध्ये धोनीचं ‘सिलेक्शन’; ‘या’ निर्णयामागील रजनीकांत कनेक्शन माहितीय का?

यासंदर्भात एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या तक्रारीमध्ये काहीच तर्क नसल्याचंही या अधिकाऱ्याने म्हटलंय. संघाची निवड झाली असून धोनी केवळ मार्गदर्शक म्हणून संघासोबत असणार आहे. तसेच विश्वचषक स्पर्धा ही आयपीएलचा उर्वरित हंगाम संपल्यानंतर होणार आहे. त्याचप्रमाणे धोनी आयपीएलचा पुढील सिझन खेळणार आहे की नाही ते सुद्धा अद्याप स्पष्ट नाहीय, असं हा अधिकारी म्हणाला आहे. धोनीला झुकतं मात देण्यात आलं असून तो आयपीएल खेळण्याबरोबरच संघासोबत मार्गर्शक म्हणूनही जाणार असल्याने संघ निवड आणि इतर गोष्टींवर त्याचा प्रभाव असू शकतो अशी शक्यता तक्रारीत व्यक्त करण्यात आलीय.

नक्की पाहा हे फोटो >> विराटला त्या सेलिब्रेशनमुळे ‘Classless’ म्हणणाऱ्या ब्रिटीश मीडियाचा जाफरने उतरवला माज

“या अशापद्धतीच्या तक्रारी या एखाद्याविरोधात काहीतरी हेतून केलेल्या असतात हे आता स्पष्ट झालं आहे. नवीन नियम लागू झाल्यापासून अशा तक्रारी वाढल्यात. विश्वचषक स्पर्धा आयपीएलनंतर होणार आहे. आयपीएलनंतर प्रत्येक खेळाडू हा करारमुक्त असेल आणि पुढील पर्वाआधी लिलाव होईल त्यानंतरच संघामध्ये नवीन लोकांचा समावेश केला जाणार आहे. पुढील पर्व धोनी सीएसकेच्या संघात असेल की नाही हे ही आता सांगात येत नाही,” असं या अधिकाऱ्याने म्हटलंय.

“त्याहून महत्वाचं म्हणजे संघाची निवड पूर्ण झालेली आहे. तसेच मार्गदर्शक असणारी व्यक्तीचा या निवडीमध्ये काहीच सहभाग नसतो. तो केवळ या संघामधील व्यक्तींना मार्गदर्शन करणार असतो. तो (धोनी) हा एक वरिष्ठ खेळाडू आहे. तो प्रत्यक्षात खेळत नाहीय. धोनीला झुकतं माप दिल्याची तक्रार लक्षात घेतली तर भारताचा कर्णधार असणाऱ्या विराट कोहलीने तर आयपीएलमध्ये सहभागीच व्हायला नको ना?,” असा प्रतिप्रश्न बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय. अन्य एका अधिकाऱ्याने धोनी या नियुक्तीमुळे अशा पदावर आहे की यापूर्वी त्या ठिकाणी कोणताही भारतीय क्रिकेटपटू नव्हता. त्यामुळे जर ही तक्रार ग्राह्य धरली तर तो चुकीचा निर्णय ठरेल असं मत व्यक्त केलंय.

नक्की वाचा >> T20 World Cup : टीम इंडियामध्ये मुंबई इंडियन्सचा दबदबा, एक दोन नाही तर तब्बल ६ खेळाडूंना मिळाली संधी

युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी संघासोबत मार्गदर्शक म्हणून जाण्याची तयारी दर्शवणाऱ्या धोनीचे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुलीने आभार मानलेत. “धोनी या संघासोबत जाणार असल्याने त्याच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेमध्ये संघाला मदत करण्यासाठी धोनीला दिलेली ऑफर त्याने स्वीकारल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे,” असं गांगुलीने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सांगितलं.

नक्की वाचा >> T20 World Cup: चार वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर अश्विनने पोस्ट केला घरातील भिंतींचा फोटो; म्हणाला…

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारतीय संघाच्या मार्गदर्शकाच्या (मेंटॉर) भूमिकेत दिसणार आहे. दोन विश्वचषक विजेत्या धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, तो पुन्हा भारतीय संघाशी जोडला जाणार आहे. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकात धोनी भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी पार पाडेल. मी त्याच्याशी दुबई येथे चर्चा केली होती. या स्पर्धेत मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याची त्याने तयारी दर्शवली आहे. त्यानंतर मी माझे सहकारी, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी चर्चा केली. धोनीमुळे भारतीय संघाला फायदा होईल यावर आमचे एकमत झाले,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bcci receives conflict of interest complaint against dhoni after naming him mentor for t20 wc squad scsg

ताज्या बातम्या