scorecardresearch

World Cup 2023: विश्वचषकासाठी खास पाहुण्यांच्या यादीत रजनीकांत यांचा समावेश, जय शाहांनी दिले ‘Golden Ticket’

Jay Shah Gives Rajinikanth Golden Ticket: बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी दिग्गज अभिनेते रजनीकांत यांना आयसीसीच्या विश्वचषक स्पर्धेचे गोल्डन तिकीट प्रदान केले. या अगोदर फक्त दोघांनाच हे गोल्डन तिकीट देण्यात आले होते.

ICC World Cup 2023 Updates
जय शाहांनी रजनीकांत यांना गोल्डन तिकीट दिले (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

Jay Shah awarded legendary actor Rajinikanth with a golden ticket: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ ची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेसाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे. बीसीसीआय भारतातील दिग्गज स्टार्सना गोल्डन तिकीट देत आहे. बीसीसीआयने अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट दिले होते. आता या यादीत सुपरस्टार रजनीकांतचेही नाव जोडले गेले आहे. मंगळवारी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अभिनेता रजनीकांत यांना गोल्डन तिकीट दिले.

वास्तविक बीसीसीआयने एक्स (ट्विटर) वर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये जय शाह रजनीकांत यांना गोल्डन तिकीट देताना दिसत आहे. बोर्डाने फोटोसोबत कॅप्शन लिहिले की, “माननीय बीसीसीआय सचिव जय शाह यांनी श्री रजनीकांत यांना गोल्डन तिकीट देऊन त्यांचा सन्मान केला. या दिग्गज अभिनेत्याने लाखो हृदयांच्या ठोक्यांवर अमिट छाप सोडली आहे.”

Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

बीसीसीआयने सर्वात अगोदर बॉलिवूडचे महान अभिनेते अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट दिले होते. यानंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही गोल्डन तिकीट देऊन गौरविण्यात आले आहे. बीसीसीआय हे गोल्डन तिकीट अधिक दिग्गजांना भेट देऊ शकते. काही दिवसापूर्वी माजी भारती कर्णधार सुनील गावसकर यांनी कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीला गोल्डन तिकीट देण्याची मागणी केली होती.

हेही वाचा – IND vs SL: ‘त्या सर्व लोकांच्या तोंडावर ही मोठी चपराक…’; भारत-श्रीलंका सामन्यांवर आरोप करणाऱ्यांना सुनील गावसकरांचा टोला

स्पोर्टस्टारसाठीच्या त्यांच्या स्तंभात, गावसकर यांनी आपले विचार व्यक्त करताना लिहले होते, “बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्या संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे हा एक चांगला निर्णय आहे. आतापर्यंत अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी गोल्डन तिकिटे मिळाली आहेत.”

सुनील गावसकर पुढे म्हणाले होते की, “यादीतील अतिरिक्त लोकांची संख्या अज्ञात आहे. तथापि, यामध्ये इस्रोच्या संचालकांचा समावेश अपेक्षित आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारताने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली. त्या शहरांमध्ये होणार्‍या सामन्यांमध्ये सहभागी होण्यासाठी संघटनांना त्यांच्या संबंधित शहरांतील भारतीय खेळाडूंना आमंत्रित करण्याचे निर्देश दिले तर एक उल्लेखनीय उपक्रम ठरेल. अर्थात, दोन विश्वचषक चॅम्पियन कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कपिल देव हे आणखी दोन खेळाडू गोल्डन तिकिटांसाठी पात्र आहेत.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bcci secretary jay shah awarded legendary actor rajinikanth with a golden ticket for the icc world cup on tuesday vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×