भारतीय संघाच्या निवड समिती प्रमुख पदासाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता अर्ज केलेल्या खेळाडूंसह वाचकांना देखील लागली आहे. टी२० विश्वचषकातील अपयशानंतर बीसीसीआयने चेतन शर्मा याच्या नेतृत्वाखालील संपूर्ण निवड समिती बरखास्त केली होती. यापुढील रणनीती अंमलात आणण्यासाठी संघाची निवड करणारा चेहरा कोण असेल यावर सर्वांच्याच अपेक्षा आहेत. बीसीसीआयने मागवलेल्या अर्जांची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर होती. आता या पदासाठी अर्ज केलेल्यांची नावे समोर येत आहेत. त्यात मुंबईच्या खेळाडूंची देखील नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी डावखुरा फिरकीपटू मनिंदर सिंग, माजी सलामीवीर फलंदाज शिव सुंदर दास यांनी भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीच्या पदासाठी अर्ज केले आहेत. तो भारतासाठी 20 हून अधिक कसोटी खेळला आहे. माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरने अर्ज केला आहे की नाही याची पुष्टी झालेली नाही. अजित आगरकर यांनी अर्ज केल्यास त्यांची निवड समितीचे अध्यक्षपद निश्चित असल्याचे मानले जात आहे.

मुंबईच्या वरिष्ठ संघ निवड समितीचे विद्यमान प्रमुख सलील अंकोला, माजी यष्टिरक्षक समीर दिघे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी मुंबईतून अर्ज केला आहे. नव्या निवड समितीसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ५० हून अधिक लोकांनी अर्ज केल्याचे समजते. विनोद कांबळी टीम इंडियाचा सिलेक्टर बनण्यास उत्सुक आहे. अलीकडेच या डावखुऱ्या फलंदाजाने खुलासा केला होता की, बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनने त्याचे घर चालते. कांबळीला बीसीसीआय कडून ३० हजार रुपये पेन्शन मिळते. विनोद कांबळी यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सध्या ते बेरोजगार आहेत आणि त्यांचे कुटुंब केवळ पेन्शनवर चालत आहे.

हेही वाचा :   “संघ डरपोक…”, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने जस्टिन लँगरला दिले चोख प्रत्युत्तर

अजित आगरकरांबाबत संभ्रम

मिळालेल्या माहितीनुसार, अजित आगरकरने अर्ज केल्यास तो मुख्य निवडकर्ता होण्याची खात्री आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, याशिवाय माजी फिरकीपटू मनिंदर सिंग, माजी सलामीवीर शिव सुंदर दास यांच्यासह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी टीम इंडियाच्या वरिष्ठ निवडकर्त्यांच्या पदांसाठी अर्ज केले आहेत.

हेही वाचा :   FIFA WC 2022: इंग्लंड, अमेरिकेला नॉकआउटमध्ये पोहचण्याची संधी, तर यजमान शेवट गोड करणार का? याकडे लक्ष

मुख्य निवडकर्ता होण्यासाठी आवश्यक पात्रता

टीम इंडियाच्या निवड समितीचा मुख्य निवडकर्ता होण्यासाठी, या पदासाठीच्या उमेदवाराला किमान ७ किंवा अधिक कसोटी सामने खेळण्याचा अनुभव असावा. उमेदवाराला ३० प्रथम श्रेणी सामने, १० एकदिवसीय सामने किंवा २० लिस्ट-ए सामन्यांचा अनुभव असावा. मुख्य निवडकर्ता पदासाठीच्या उमेदवाराने क्रिकेटमधून निवृत्तीची ५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci selection committee a new twist in the process of bcci selection committee vinod kamblis name is heavily discussed avw
First published on: 29-11-2022 at 17:21 IST