आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियाच्या वारंवार अपयशानंतर, बीसीसीआयला आता माजी कर्णधार एमएस धोनीचे दरवाजे ठोठावण्यास भाग पडत आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक २०२२ च्या पराभवानंतर, बीसीसीआय भारतीय टी-२० क्रिकेट सेटअपसह मोठ्या भूमिकेसाठी एमएस धोनीला नियुक्त करण्याचा विचार करु शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, बोर्ड धोनीला भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी भूमिकेसाठी बोलावण्याचा विचार करत आहे. धोनीला डॉयरेक्टर ऑफ क्रिकेट ( क्रिकेट संचालक) पदी नियुक्त केले जाऊ शकते.

‘द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना तिन्ही फॉरमॅटचे व्यवस्थापन करण्याचा भार खूप जास्त आहे, असे वाटल्याने बीसीसीआय प्रशिक्षकपदाची भूमिका विभाजित करण्याचा विचार करत आहे. धोनीचा टी-२० फॉरमॅटमध्ये समावेश करून भारतीय क्रिकेट संघाचा दर्जा उंचावण्यासाठी बोर्ड प्रयत्नशील आहे. अहवालानुसार, या महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाईल.

chavadi lok sabha election 2024 maharashtra political crisis
चावडी : जागा चार आणि आश्वासने भारंभार !
communist party of india marxist marathi news
दिंडोरीत माकपच्या भूमिकेत बदल, जागा न सोडल्यास उमेदवारीची तयारी
Neither the legislature nor the executive has the right to exceed the reservation limit
आरक्षण मर्यादा ओलांडण्याचा अधिकार कायदेमंडळ, कार्यपालिकेलाही नाही
Z Category Security to CEC
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड श्रेणीची सुरक्षा; ‘आयबी’च्या अहवालानंतर केंद्र सरकारचा निर्णय

याआधी धोनीने यूएईमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान संघासोबत काम केले होते, परंतु तो अंतरिम आधारावर त्यांच्यासोबत होता. जवळपास आठवडाभराच्या सहभागासह संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला होता. तथापि, बीसीसीआयला वाटते की, अधिक महत्त्वपूर्ण भूमिका निश्चितपणे भारतीय टी-२० स्थापित करण्यात मदत करेल.

पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलनंतर धोनी खेळातून निवृत्त होणार असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. बीसीसीआय त्याच्या अनुभवाचा आणि तांत्रिक कौशल्यांचा योग्य वापर करण्यास उत्सुक आहे आणि त्यात माजी भारतीय कर्णधाराचा समावेश असेल. दुहेरी विश्वचषक विजेत्याला विशेष खेळाडूंसोबत काम करण्यास आणि भारतीय टी-२० संघाचे व्यवस्थापन करण्यास सांगितले जाऊ शकते.

हेही वाचा – IPL 2023: केकेआरला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू देखील आयपीएलमध्ये सहभागी होणार नाही

बीसीसीआयच्या एपेक्स परिषदेची बैठक कधी आहे?

सध्या एपेक्स परिषदेच्या बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही. पण बोर्डाच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अधिकृत बैठक होणार आहे. ज्यामध्ये क्रिकेट सल्लागार समितीच्या स्थापनेवर चर्चा होणार आहे. तसेच, निवड समितीमधील नवीन सदस्यांची नियुक्तीवर आणि विभाजित प्रशिक्षकांच्या भूमिकेवर सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत चर्चा होऊ शकते.