भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयने निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. निवडणुकीसोबतच वार्षिक सर्वसाधारण सभेचेही आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआय १८ ऑक्टोबरला निवडणूक घेणार आहे. हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसह सर्व पदांसाठी असेल. सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. तर जय शहा हे सचिवपदावर आहेत. या दोघांचाही कार्यकाळ पूर्ण होत आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. आता गांगुली आणि शाह आणखी एका कार्यकाळासाठी निवडणूक लढवू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वोच्च न्यायालयाकडून कुलिंग ऑफ पिरियड या नियमात सूट देण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयच्या निवडणूक प्रकियेला वेग आला आहे. येत्या १८ ऑक्टोबरला बीसीसीआयची निवडणूक होणार आहे; पण त्याआधीच्या सर्व प्रकियांना सुरुवात झाली आहे. बीसीसीआयकडून निवडणूक अधिकारी म्हणून ए. के. ज्योती यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक संलग्न संघटनांना आपल्या प्रतिनिधीचे नाव देण्यास ४ ऑक्टोबरपर्यंतचा अवधी दिला आहे.

हेही वाचा :  India T-20 Wins in 2022: ऑस्ट्रेलियाचा पराभव आणि पाकिस्तानला दणका; टीम इंडियाने मोडला ‘हा’ विक्रम 

बीसीसीआयच्या निवडणुकीसंदर्भात ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या बातमीनुसार, मुंबईत १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. यासाठी मंडळाने २४ सप्टेंबरपासून अर्ज मागवले आहेत. ४ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. नामनिर्देशन अर्जांची छाननी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. वैध नामांकनांची यादी १३ तारखेलाच प्रसिद्ध केली जाईल. यानंतर १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होणार आहे.

हेही वाचा :  ताप असताना सूर्यकुमारने खेळली ६९ धावांची खेळी, सामन्यानंतर केला मोठा खुलासा 

विशेष म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र हे दोघेही पुन्हा एकदा नव्या कार्यकाळासाठी निवडणूक लढवू शकतात. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नवा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर नियम बदलले आहेत. १८ ऑक्‍टोबरला निवडणुकीसोबतच होणाऱ्या सहाय्यक महाव्यस्थापक पदासंदर्भातही (एजीएम) महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये आयसीसीच्या करासह आयसीसीच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci will soon have a new president and vice president elections will be held in mumbai on october 18 avw
First published on: 26-09-2022 at 16:49 IST