IPL 2023 Latest Updates: इंडियन प्रीमियर लीग २०२३ या स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलचा १६वा हंगाम खेळला जाणार आहे.ज्याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. दरम्यान आयपीएल सुरु होण्याआधी आयपीएलच्या ७ संघासाठी एक वाईट बातमी आहे. कारण जवळपास १० खेळाडू या मोठ्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहेत. हे सर्व खेळाडू दक्षिण आफ्रिका संघातील आहेत.

आयपीएल या सात संघांसाठी वाईट बातमी –

आयपीएलमध्ये सहभागी होणारे सर्व दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूंच्या संबंधित फ्रँचायझींसाठी सुरुवातीचे सामने खेळू शकणार नाहीत. ज्याचा तोटा फ्रँचायझीला सहन करावा लागू शकतो. यामागे मोठे कारण आहे. वास्तविक, दक्षिण आफ्रिका संघाला ३१ मार्च ते २ एप्रिल दरम्यान नेदरलँड्सविरुद्ध २ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. ज्यामध्ये हे खेळाडू सहभागी होणार आहेत.

wresters deepak punia sujeet denied entry to asia olympic qualifiers tournament
आशिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दीपक, सुजितला प्रवेश नाकारला! दुबईतील पावसामुळे बिश्केकमध्ये पोहोचण्यास उशीर
Gautam Gambhir Hugs MS Dhoni after CSK vs KKR Match IPL 2024
IPL 2024: चेन्नई-कोलकाताच्या सामन्यापेक्षा धोनी-गंभीरच्या गळाभेटीची चर्चा, दोघांच्या ‘जादू की झप्पी’ चा VIDEO व्हायरल
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Big blow to Sunrisers Hyderabad team in IPL 2024
IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू टाचेच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: हिटमॅनला तीन मोठे विक्रम रचण्याची सुवर्णसंधी; फक्त ‘इतक्या’ धावा करताच रचणार इतिहास

यामुळे खेळाडू सलामीचा सामन्यांना मुकणार –

खरेतर, दक्षिण आफ्रिकेला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र होण्यासाठी नेदरलँड्सविरुद्धची वनडे मालिका जिंकावी लागेल. २ मार्चला शेवटचा वनडे असेल तर ३१ मार्चपासून आयपीएल सुरू होईल. म्हणजेच या मालिकेत सहभागी होणारे खेळाडू पहिल्या ४ दिवसात होणाऱ्या आयपीएल सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत.

बीसीसीआयला माहिती मिळाली –

दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी बीसीसीआयला दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड यांच्यातील एकदिवसीय मालिकेची माहिती दिली आहे. ही मालिका आफ्रिकेसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ही मालिका जिंकल्यानंतरच दक्षिण आफ्रिकेचा संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या आठ संघांमध्ये थेट पात्र ठरेल.

हे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्याला मुकू शकतात –

१.कागिसो रबाडा, (पंजाब किंग्स)
२.क्विंटन डी कॉक, (लखनौ सुपर जायंट्स)
३.एनरिक नॉर्खिया, (दिल्ली कॅपिटल्स)
४.लुंगी एनगिडी, (चेन्नई सुपर किंग्स)
५.एडन मार्कराम, (सनरायझर्स हैदराबाद)
६.हेन्रिक क्लासेन, (सनरायझर्स हैदराबाद)
७.मार्को जेन्सन, (सनरायझर्स हैदराबाद)
८.ट्रिस्टन स्टब्स, (मुंबई इंडियन्स)
९.डेवाल्ड ब्रेविस, (मुंबई इंडियन्स)
१०.डेव्हिड मिलर, (गुजरात जायंट्स)

हेही वाचा – IPL 2023: शार्दुल ठाकूरनंतर ‘या’ धडाकेबाज खेळाडूने केले लग्न; RCBचे वाढले टेन्शन!

या संघांना मोठा धक्का –

आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागलेल्या खेळाडूंमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे अॅनरिक नॉर्खियन आणि लुंगी एनगिडी यांचा समावेश आहे. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादच्या एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन आणि मार्को जॅनसेन यांचा समावेश आहे.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: हिटमॅनला तीन मोठे विक्रम रचण्याची सुवर्णसंधी; फक्त ‘इतक्या’ धावा करताच रचणार इतिहास

मुंबई इंडियन्सचे ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस हे देखील आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे, तर गुजरात जायंट्सचा डेव्हिड मिलर सलामीच्या सामन्याला मुकणार आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट्समधील क्विंटन डी कॉक आणि पंजाब किंग्जमधील कागिसो रबाडा हे देखील नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणार आहेत.