Cheteshwar Pujara 100th Test: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत टीम इंडिया १-०ने पुढे आहे. शुक्रवारपासून दिल्लीत दुसरी कसोटी खेळली जाणार असून कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारासाठी हा सामना खूप खास आहे. ही त्याची १००वी कसोटी असेल आणि या विक्रमाला स्पर्श करण्यापूर्वी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या बैठकीची छायाचित्रेही बीसीसीआयने शेअर केली आहेत. विशेष सामन्यापूर्वी पीएम मोदींनी पुजाराला शुभेच्छाही दिल्या. या भेटीत क्रिकेटपटूची पत्नी पूजाही त्याच्यासोबत होती.

३५ वर्षीय मिस्टर डिपेंडंट पुजारा म्हणाला की, “त्याने निवृत्तीची तारीख निश्चित केलेली नाही आणि त्याला एकावेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. अजून माझ्यात खूप क्रिकेट बाकी आहे.” कसोटी सामन्यापूर्वी पुजारा आणि त्याची पत्नी पूजा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पुजाराने ट्विट केले की, “आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना भेटणे हा एक सन्मान होता. माझ्या १००व्या कसोटीपूर्वी मी तुमच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनासाठी आभारी आहे. धन्यवाद PMOIndia!” ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, “आज पूजा आणि तुला भेटून आनंद झाला. तुझ्या १००व्या कसोटीसाठी आणि तुझ्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.”

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Chhagan Bhujbal Hemant Godse and other Political leaders gather in Kalaram temple
नाशिक : काळाराम मंदिरात राजकीय नेत्यांची लगबग
Ramdas Tadas sure about Prime Minister Narendra Modis meeting in Vardha
पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान चेतेश्वर पुजाराची पत्नी पूजाही त्यांच्यासोबत होती. काही दिवसांपूर्वी या जोडप्याने त्यांच्या लग्नाचा १०वा वाढदिवस साजरा केला. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर पुजाराने ट्विट केले की, “पंतप्रधानांना भेटून मला खूप आनंद झाला. त्याच्याशी छान गप्पा झाल्या.” पीएम मोदींनीही ट्विटला उत्तर दिले आणि भविष्यासाठी आणि १००व्या कसोटी सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीसीसीआयनेही हे ट्विट पुन्हा शेअर केले आहे.

पुजाराने २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने कसोटी विशेषज्ञ म्हणून एक विशेष ओळख निर्माण केली. त्याच्या १००व्या कसोटी सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी त्याचे कुटुंबही स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहे. तो म्हणाला, “ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी कसोटी हा माझा १००वा कसोटी सामना असेल पण त्यानंतर आमच्याकडे आणखी दोन कसोटी सामने खेळायचे आहेत जे आमच्यासाठी जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे असतील.”

हेही वाचा: WPL Auction: कोणी घर घेणार तर कोणी कर्ज फेडणार! छोट्या लेकींची मोठी स्वप्ने होणार साकार, WPLने आयुष्य होणार प्रकाशमान

पुजाराकडून दिल्लीच्या मैदानावर मोठ्या खेळीची अपेक्षा आहे

बांगलादेशविरुद्ध शतक झळकावून फॉर्ममध्ये परतल्याचा दाखला या कसोटी खेळाडूने दिला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात तो केवळ ७ धावा करून बाद झाला. आता दिल्लीत या खेळाडूच्या बॅटमधून चांगल्या धावा निघतील अशी चाहत्यांना आशा आहे. भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे आणि रोहित शर्मा आणि त्याचा संघ दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार्‍या सामन्यात २-० ने विजय मिळविण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.