Pat Cummins gave an important comment about the IPL: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ सराव सत्रात घाम गाळत आहेत. यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएल खेळत होते. परंतु आता ते आपापल्या राष्ट्रीय कर्तव्यावर परतले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आता शानदार सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पण याआधी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने आयपीएलबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

कमिन्स आयपीएलबद्दल काय म्हणाला –

आयपीएलने खेळाडूंच्या वेळेवरील आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स यांनी व्यक्त केले आणि भविष्यात खेळाडूंना फ्रेंचायझी क्रिकेटपेक्षा राष्ट्रीय संघाचे महत्त्व पटवून देणे हे आव्हान असेल. कमिन्स म्हणाला की, आयपीएलने एक दशकापूर्वी क्रिकेटचा लँडस्केप बदलला आणि म्हणूनच जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेटचा करार नाकारण्याच्या ट्रेंट बोल्टच्या निर्णयाशी त्याने सहमती दर्शवली आहे.

IPL 2024 PBKS Vs RR Match Updates in Marathi
PBKS vs RR : संजू सॅमसनने धोनीप्रमाणे दाखवली चतुराई, लियाम लिव्हिंगस्टोनच्या ‘रनआऊट’चा VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

७ जूनपासून ओव्हल येथे भारताविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलपूर्वी, कमिन्सने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, असे काही काळाने घडणार आहे असे वाटत होते आणि आता ते घडत आहे. तो म्हणाला की, खेळाडूंचा काळ आता पूर्वीसारखा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची मक्तेदारी राहिलेला नाही. आयपीएलने दशकापूर्वी ते बदलले पण आता अधिकाधिक खेळाडू त्यात सामील होत आहेत. त्यामुळे मला वाटते की, आपण त्याबद्दल सक्रिय असले पाहिजे.

हेही वाचा – Virender Sehwag: “आता माझे केस शोएब अख्तरच्या…”, पाकिस्तानच्या माजी खेळाडूला वीरेंद्र सेहवागने दिले चोख प्रत्युत्तर

कमिन्सला त्याच्या खेळाडूंकडून काय अपेक्षित आहे?

कमिन्सची इच्छा आहे की त्याच्या खेळाडूंनी इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा राष्ट्रीय संघाला प्राधान्य द्यावे, परंतु सध्याच्या मोठ्या पैशाच्या फ्रँचायझी-आधारित लीगच्या युगात असे करणे आव्हानात्मक असेल. तो म्हणाला की, आम्हाला ऑस्ट्रेलियासाठी खेळणे शक्य तितके खास बनवायचे आहे. पण ते आव्हान असणार आहे. याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा. कमिन्स म्हणाला की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमुळे द्विपक्षीय कसोटी मालिका अधिक महत्त्वाची झाली आहे. तो म्हणाला की भारताविरुद्धच्या पहिल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळण्यासाठी तो उत्सुक आहे.