Team India New Kit Sponsor: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक बीसीसीआयने जाहीर केला आहे. भारतीय संघाचा नवीन किट प्रायोजक म्हणून जर्मन स्पोर्ट्स ब्रँड अदिदास (Adidas) चे नाव जाहीर करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी २२मे रोजी ही माहिती दिली.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी टीम इंडियाच्या नवीन क्रिकेट किट प्रायोजकाची घोषणा केली आहे. आता भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर अदिदासचा लोगो दिसणार आहे. यापूर्वी बीसीसीआयची ही डील किलरसोबत होती. पण आता BCCI ने Adidas सोबत हातमिळवणी केली आहे, असे सांगण्यात येत आहे की हा करार जून २०२३ पासून ५ वर्षांसाठी करण्यात आला आहे.

rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
d Gukesh defeated Nijat Abasov in the Candidates chess tournament sport news
गुकेश संयुक्त आघाडीवर! पाचव्या फेरीत अबासोववर मात; अन्य भारतीयांच्या लढती बरोबरीत
nitin menon
भारताचे नितीन मेनन सलग पाचव्यांदा विशेष पंच श्रेणीत
Why is Smriti Mandhanas success in WPL important for Indian cricket
विश्लेषण : स्मृती मनधानाचे ‘डब्ल्यूपीएल’मधील यश भारतीय क्रिकेटसाठी का महत्त्वाचे?

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, “किट प्रायोजक म्हणून आदिदाससोबतची आमची भागीदारी जाहीर करताना मला आनंद होत आहे. आम्ही क्रिकेट खेळाच्या वाढीसाठी वचनबद्ध आहोत आणि जगातील आघाडीच्या स्पोर्ट्सवेअर ब्रँड्सपैकी एकाशी भागीदारी करण्यासाठी आम्ही अधिक उत्साहित आहोत. अदिदास तुमचे स्वागत आहे.” बीसीसीआय गेल्या काही वर्षांपासून वारंवार किटचे प्रायोजक बदलत आहे. २०२० मध्ये Nike सोबतचा करार संपल्यानंतर, Byjus आणि MPL सारख्या प्रायोजकांनी बोर्डाशी करार केला होता.

जरी MPL चा BCCI सोबतचा करार २०२३च्या वर्षाअखेरपर्यंत होता, तरीपण मध्येच त्यांनी हा करार संपवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर किलर भारतीय क्रिकेट संघाचा किट प्रायोजक बनला. तीन वर्षांच्या करारासाठी एमपीएल भारतीय बोर्डाला प्रति सामन्यासाठी ६५ लाख आणि रॉयल्टी म्हणून ९ कोटी देत ​​होती. बीसीसीआयने मुख्यतः जीन्स बनवणाऱ्या किलर ब्रँडशी पाच महिन्यांचा करार केला होता.

आदिदासने २००६मध्ये भारतीय संघाच्या प्रायोजकत्वासाठी प्रथम बोली लावली, परंतु लिलावात ती मागे राहिली. त्यादरम्यान नाईकीने रिबॉक आणि आदिदास यांचा पराभव करून हे करार मिळवले होते. नाईकीने भारतीय क्रिकेटशी अनेकवेळा आपला संबंध वाढवला आहे; BCCI ला प्रत्येक सामन्यासाठी ₹८५ लाख आणि ₹३० कोटींची रॉयल्टी शेवटी दिली होती.

हेही वाचा: IPL 2023: “संघाला अक्षर पटेल खटकतो…” माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर दिल्ली कॅपिटल्सवर संतापले

भारतीय क्रिकेट संघ आयपीएलनंतर प्रथम विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाईल. यानंतर आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा आहेत. एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे.