अल्जेरियाला पराभूत करत ‘डॉर्क हॉर्स’ समजल्या जाणाऱ्या बेल्जियमने दमदार सुरुवात केली असून, त्यांच्यापुढे दुसऱ्या सामन्यात आव्हान असेल ते रशियाचे. हा सामना जिंकल्यास बेल्जियमला बाद फेरीच पोहोचण्याची संधी असून ते रशियावर विजय मिळवण्यासाठी आसुसलेले असतील. दुसरीकडे रशियाला पहिल्या सामन्यात दक्षिण कोरियाबरोबर १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा असेल.
या गटात बेल्जियमचा संघ सर्वोत्तम समजला जात आहे. कारण गेल्या वर्षभरात त्यांनी दमदार कामगिरी करत बरेच धक्के दिले आहेत. दुसरीकडे रशियाच्या संघानेही आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघ ४-२-३-१ या व्यूहरचनेनुसार मैदानात उतरणार असले तरी रशियाचा संघ बचावावर अधिक भर देईल.
सामना क्र. ३२
‘ह’ गट : बेल्जियम वि. रशिया
स्थळ :  इस्टाडियो मराकान, रिओ दे जानिरो