Ben Duckett vs Don Bradman : आर्यलॅंडविरोधात होत असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने इतिहास रचला आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन डकेटने १८२ धावांची शतकी खेळी केली. डकेटने १५० चेंडूत १५० धावा केल्या. त्याने अशी कामगिरी करून सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला आहे. बेन लॉर्ड्सच्या मैदानात सर्वात वेगवान १५० धावा करणारा फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम ब्रॅडमन यांच्या नावावर होता. ब्रॅडमनने १९३० मध्ये लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरोधात झालेल्या कसोटी सामन्यात १६६ चेंडूत १५० धावांची खेळी केली होती. म्हणजेच डकेटने लॉर्ड्सच्या मैदानावर ऐतिहासिक कामगिरी केली आहे आणि ९३ वर्षांचा जुना विक्रम मोडून इतिहास रचला आहे.
लॉर्ड्समध्ये सर्वात वेगवान १५० धावा करणारे फलंदाज




बेन डकेट – १५० चेंडू, २०२३
डॉन ब्रॅडमन – १६६ चेंडू, १९३०
केविन पीटरसन, १७६ चेंडू, २००८
तसंच डकेटनंतर दुसरीकडे ओली पोपने २०८ चेंडूत २०५ धावांची खेळी खेळली. तर बेन डकेटने १७८ चेंडूत १८२ धावा कुटल्या. इंग्लंडने त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये ५२४ धावा करून इनिंग जाहीर केली. डकेट आणि पोपने मिळून दसुऱ्या विकेटसाठी २५२ धावांची भागिदारी केली. तर आर्यलॅंडने पहिल्या इनिंगमध्ये १७२ धावा केल्या होत्या. आर्यलॅंडने त्यांच्या दुसऱ्या इनिगंमध्ये खेळ संपेपर्यंत ३ विकेट्स गमावत ९७ धावा केल्या होत्या. त्यामुळे आर्यलॅंडचा संघ २५५ धावांनी मागे आहे.