Ben Stokes Injured in The Hundreds: सध्या द हंड्रेड ही स्पर्धा इंग्लंडमध्ये खेळवली जात आहे. द हंड्रेडच्या एका सामन्यात इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. त्यामुळे इंग्लंड संघाची चिंता वाढली आहे. श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना १० दिवसांपेक्षा कमी कालावधीत सुरू होणार आहे. स्टोक्स या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे. आता त्यांचे स्कॅनिंग करावे लागणार आहे.

हेही वाचा – Rohit-Virat: रोहित शर्मा-विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमधील ‘ही’ स्पर्धा खेळणार, कसोटी मालिकेच्या तयारीसाठी BCCI चा खास प्लॅन

Ben Stokesला श्रीलंका मालिकेपूर्वी मोठी दुखापत

नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्सला मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या डावात दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले. त्याला पकडून मैदानाबाहेर न्यावे गेले. त्याच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगमध्ये दुखापत आहे. सामना संपल्यानंतर तो कुबड्यांच्या साहाय्याने चालताना दिसला. नॉर्दर्न सुपरचार्जर्सचा कर्णधार हॅरी ब्रूकने नंतर सांगितले केली की दुखापत गंभीर असू शकते. या दुखापतीनंतर बेन स्टोक्स कुबड्यांचा आधार घेत चालताना दिसत आहे. त्याचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

ओल्ड ट्रॅफर्ड येथे मँचेस्टर ओरिजिनल्सविरुद्ध सुपरचार्जर्सच्या १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टोक्सला धाव घेताना त्याच्या हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. नॉन-स्ट्रायकरच्या बाजूने झटपट धाव घेत असताना, स्टोक्स त्याच्या डाव्या पायाला धरून मैदानात पडला होता. स्टोक्स दोन धावांवर रिटायर्ड हर्ट झाला आणि त्याच्या जागी त्याचा हॅरी ब्रूक मैदानात आला. सामना संपल्यानंतरही तो कुबड्यांचाच्या सहाय्याने चालत होता आणि त्याच अवस्थेत चाहत्यांना ऑटोग्राफही देत ​​होता.

स्टोक्सला याआधी डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. अशा स्थितीत आता हॅमस्ट्रिंगची दुखापत ही इंग्लंडसाठी चिंतेची बाब आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला आधीच सलामीवीर झॅक क्रॉऊलीची कमी भासणार आहे. त्यात आता स्टोक्सची दुखापत संघासाठी मोठ सेटबॅक असेल.

हेही वाचा – Vinesh Phogat: “विनेश फोगट प्रकरणात स्वतः खेळाडू व प्रशिक्षक जबाबदार”, IOA च्या अध्यक्ष पीटी उषा यांचे मोठे वक्तव्य

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२०२५ च्या गुणतालिकेत इंग्लंडचा सहाव्या स्थानावर आहे आणि जर त्यांना अंतिम फेरी गाठायची असेल तर त्यांना ही घरची मालिका एकतर्फी जिंकावी लागेल. अशा परिस्थितीत कर्णधाराला अशाप्रकारे दुखापत होणे हा मोठा धक्का ठरू शकतो. इंग्लंड २१ ऑगस्टपासून ओल्ड ट्रॅफर्ड येथे श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात करेल. दुसरा सामना २९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर तर तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना ६ सप्टेंबरपासून ओव्हलवर खेळवला जाईल.