India vs New Zealand, Team India T20I Squad: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना सुरू असतानाच बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह भारतीय अ संघाची देखील घोषणा करण्यात आली आहे.
स्विंग किंगचं भारतीय संघात पुनरागमन
भुवनेश्वर कुमार हा भारतीय टी-२० संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो भारतीय संघात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात होता. तो नव्या आणि जून्या चेंडूने स्विंग करू शकतो. यासह सुरूवातीच्या षटकांत तो विकेट मिळवून देण्यात तरबेज आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. आता वर्ल्डकप २०२७ स्पर्धेच्या दृष्टीने त्याला भारतीय टी-२० संघात पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार) ,अभिषेक शर्मा ,संजू सॅमसन (यष्टीरक्षक) , वैभव सूर्यवंशी इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार) ,अक्षर पटेल ,शिवम दुबे , नितीश कुमार रेड्डी , नमन धीर ,प्रिन्स यादव , मयंक यादव, अर्शदीप सिंग , भुवनेश्वर कुमार , वरुण चक्रवर्ती ,कुलदीप यादव
न्यूझीलंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय अ संघ:
यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (कर्णधार, यष्टीरक्षक), मानव सुथार, के. एल. राहुल, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश चौधरी, देवदत्त पडिक्कल, आकिब नबी, साई सुदर्शन, आर. स्मरण, आकाश दीप, यश राठोड, ऋषभ पंत* (यष्टीरक्षक), अंशुल कंबोज, मुकेश कुमार.
