Mitchell Starc Injury Update: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेची सुरूवात येत्या २८ मार्चपासून होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच लढतीत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सराव करायला सुरूवात केली आहे. मात्र, काही संघांचं टेन्शन वाढलं आहे. कारण ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू अजूनही भारतात येऊ शकलेले नाहीत. वेगवान गोलंदाज नॅथन एलिस दुखापतीमुळे आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर पॅट कमिन्स सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध राहु शकणार नाही. दरम्यान आता मिचेल स्टार्कबाबतही मोठी अपडेट समोर आली आहे.
ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नसल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली आहे. नॅथन एलिस दुखापतग्रस्त असल्यामुळे आयपीएल २०२६ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स देखील दुखापतग्रस्त आहे. पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. तर स्टार्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. स्टार्कची फिटनेस पाहता, तो देखील सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे.
आयपीएल झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला काही महत्वाचे दौरे करायचे आहेत. ज्यात भारत आणि इंग्लंड या दौऱ्यांचा समावेश आहे. या दौऱ्यांसाठी संघातील प्रमुख खेळाडू पूर्णपणे फिट असणं खूप गरजेचं असणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या वेगवान गोलंदाजांचा वर्कलोड मॅनेज करण्याच्या प्रयत्नात आहे. पण मिचेल स्टार्क सुरूवातीच्या काही सामन्यांमधून बाहेर होणं, ही दिल्ली कॅपिटल्स संघासाठी चिंतेची बाब आहे.
या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन्ही खेळाडू उपलब्ध नसणार आहेत. कमिन्सच्या जागी हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी इशान किशनकडे सोपवण्यात आली आहे. आता तो केव्हा परतरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर हेझलवूड पहिल्या सामन्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासोबत जोडला जाईल, अशी माहिती येत होती. पण याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
