DC vs GT: आयपीएल २०२६ स्पर्धेत बुधवारी होणाऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी गुजरात टायटन्स संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा कर्णधार शुबमन गिल दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्ध कमबॅक करणार असल्याची माहिती साई सुदर्शनने दिली आहे. एकीकडे गुजरात टायटन्स संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

गुजरात टायटन्ससाठी गुड न्यूज

गेल्या सामन्यात शुबमन गिल खेळू शकला नव्हता. गिलच्या अनुपस्थितीत राशिद खान संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. गुजरातला स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून गुजरातचा संघ पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे हा सामना गुजरातसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या महत्वाच्या सामन्यात गिल खेळणार असल्याची माहिती साई सुदर्शनने दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का

दिल्ली कॅपिटल्ससाठी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या सामन्यातही खेळताना दिसून येणार नाही. तो अजूनही दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तो आणखी ३ सामने बाहेर राहू शकतो. माध्यमातील वृत्तानुसार, तो २० एप्रिलला संघासोबत जोडला जाऊ शकतो.

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी असा आहे गुजरात टायटन्सचा संघ:

शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशिद खान, कगिसो रबाडा, अशोक शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जेसन होल्डर, जयंत यादव, मानव सुथार, कुमार कुशाग्र, आर. साई किशोर, इशांत शर्मा, ल्यूक वुड, टॉम बँटन, कुलवंत खेजरोलिया, अनुज रावत, अर्शद खान, गुरनूर बराड, निशांत सिंधु.

आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी असा आहे दिल्ली कॅपिटल्सचा संघ:

अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, करुण नायर, डेव्हिड मिलर, पथुम निसांका, साहील पारख, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विप्रज निगम, अजय मंडल, त्रिपुराना विजय, माधव तिवारी, अकिब डार, नितिश राणा, मिशेल स्टार्क, टी. नटराजन, मुकेश कुमार, दुष्मंथा चमीरा, लुंगी एन्गिडी, काइल जेमिसन, कुलदीप यादव.