Team India A, Riyan Parag Ruled Out: आयपीएल झाल्यानंतर भारतीय अ संघ ९ जूनपासून श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत झुंज देताना दिसून येणार आहे. या मालिकेसाठी आधीच भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली होती. या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघाची जबाबदारी युवा फलंदाज रियान परागकडे सोपवण्यात आली होती. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी रियान परागकडे सोपवण्यात आली होती. पण ही मालिका सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना बीसीसीआयकडून भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
तिरंगी मालिका सुरू होण्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. रियान पराग हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर झाला. त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला भारतीय अ संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
बीसीसीआयने रियान परागच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. तो हॅमस्ट्रिंगच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे तो बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सिलेन्समध्ये रिहॅब करण्यासाठी जाणार आहे. संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडल्यानंतर संघाच्या कर्णधारपदाची रियान परागकडे सोपवण्यात आली होती. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना राजस्थान रॉयल्स संघाने दमदार कामगिरी केली. राजस्थानला क्वालिफायर २ मध्ये गुजरात टायटन्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. तो आयपीएलच्या सर्व सामन्यांमध्ये खेळताना दिसून आला होता. पण आता तिरंगी मालिकेत तो दुखापीमुळे खेळताना दिसून येणार नाही. आता ही जबाबदारी ऋतुराज गायकवाड पार पाडताना दिसून येणार आहे. ऋतुराज गायकवाड देखील चेन्नई सुपर किंग्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.
तिरंगी मालिकेसाठी असा आहे भारतीय अ संघ:
तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधु, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), विपराज निगम, यश ठाकुर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज, अरशद खान, अनुकूल रॉय.
