Suryakumar Yadav On Abhishek Sharma Injury: आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ नामिबियाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला आहे. हा सामना भारतीय संघासाठी सराव सामन्यासारखाच असणार आहे. कारण येत्या १५ फेब्रुवारीला भारतीय संघाचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. भारताचा स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे त्याला नामिबियाविरूद्धच्या सामन्यात स्थान देण्यात आलेलं नाही. तर पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यालाही तो मुकणार असल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली आहे.
या सामन्यात नामिबियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, “आम्हालाही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची होती. आम्ही नाणेफेक गमावतोय, पण सामने जिंकतोय त्यामुळे काही समस्या नाही. दुसऱ्या डावात ड्यू असू शकतो. पण जेव्हा, धावांचा पाठलाग करतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. अभिषेक अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. तो एक- दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन देखील आक्रमक फलंदाज आहे. तर सिराजच्या जागी बुमराहला संधी देण्यात आली आहे.”
अभिषेक शर्मा अमेरिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात खेळताना दिसून आला होता. या सामन्यात तो शून्यावर माघारी परतला होता. त्यानंतर आजारी असल्यामुळे त्याला रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तो नामिबियाविरूद्धच्या सामन्यात खेळणार नाही, हे आधीच स्पष्ट झालं होतं. पण पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातूनी बाहेर होणं, हा भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. कारण हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. या सामन्यात तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. आता संजू सॅमसन त्याची जागा भरून काढून चांगली सुरूवात करून देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
भारत: संजू सॅमसन, इशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
नामिबिया: लोरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रिलिनक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मिट, मलान क्रुगर, झेन ग्रीन (यष्टिरक्षक), रुबेन ट्रम्पेलमन, बर्नार्ड शोल्टझ, बेन शिकोंगो, मॅक्स हिंगो

