ऑस्ट्रेलियापुढे बांगलादेशचे आव्हान!

बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले असून त्यांचा संघ या स्पर्धेचा विजयी शेवट करण्याचे ध्येय ठेवून मैदानात उतरेल.

दुबई : इंग्लंडकडून मोठा पराभव पत्करल्यानंतर विजयपथावर परतण्यास उत्सुक असलेल्या ऑस्ट्रेलियापुढे गुरुवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात बांगलादेशचे आव्हान असणार आहे.

बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आले असून त्यांचा संघ या स्पर्धेचा विजयी शेवट करण्याचे ध्येय ठेवून मैदानात उतरेल. आरोन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने स्पर्धेची दमदार सुरुवात करताना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला धूळ चारली होती. मात्र, इंग्लंडविरुद्ध त्यांना मोठा पराभव पत्करावा लागल्याने त्यांच्या निव्वळ धावगतीला मोठा फटका बसला. अष्टपैलू मिचेल मार्शच्या जागी डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टन एगरला संधी देण्याच्या निर्णयावरही बरीच टीका करण्यात आली. त्यामुळे मार्शचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. तसेच पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या तेज त्रिकुटाच्या कामगिरीतही सुधारणा गरजेची आहे.

’ वेळ : दुपारी ३.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Big defeat from england australia twenty20 world cup bangladesh the challenge akp

Next Story
सचिन संपलेला नाही!