आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआयने) मोठी घोषणा केली. जसप्रीत बुमराहच्या जागी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड करण्यात आली. दुखापतीमुळे आधीच भारताला मोठा धक्का बुमराहच्या रूपाने बसला होता आणि शमी देखील कोरोनामुळे आजारी असल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. पण आजारातून बरा झाल्यानंतर त्याने सराव करण्यास सुरुवात केली.

जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. अशात या बातमीने भारतीय संघासोबतच चाहत्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. मोहम्मद शमी याने मागील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) म्हणजेच एनसीएमध्ये फिटनेस चाचणी पास केली होती. बुधवारी १२ ऑक्टोबरला मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला.

भारतीय संघात जखमी जसप्रीत बुमराहला स्थान देण्यात आले आहे. शमीचे नाव यापूर्वी टी२० विश्वचषक संघाच्या राखीव यादीत समाविष्ट होते, परंतु पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह या मोठ्या स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळे या अनुभवी वेगवान गोलंदाजासाठी दरवाजे उघडले. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी अनुभवी मोहम्मद शमीची संघात निवड झाल्याची घोषणा केली. आयसीसीकडे बदली खेळाडूचे नाव देण्याची शेवटची तारीख ही १५ ऑक्टोबर होती. त्याच्या एक दिवस आधी बीसीसीआयने आपल्या संघातील बदल जाहीर केला.

हेही वाचा :   आशिया चषक २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो, बीसीसीआयच्या वार्षिक सभेत होणार चर्चा

बीसीसीआयने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की. “भारतीय वरिष्ठ संघ निवडसमितीने आयसीसी टी२० विश्वचषकासाठीच्या संघातील जसप्रीत बुमराहची बदली खेळाडू म्हणून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची निवड केली आहे. मोहम्मद शमी याआधीच ऑस्ट्रेलियामध्ये पोहचला आहे. तो ब्रिसबेनमध्ये संघाशी जोडला जाईल.” तसेच, तो सराव सामन्यापूर्वी भारतीय संघात सामील होईल. याव्यतिरिक्त मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे राखीव खेळाडू म्हणून संघात आहेत. दोघेही लवकर ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

हेही वाचा :   सय्यद मुश्ताक अली चषकात पृथ्वी शॉ बरसला, फक्त ४६ चेंडूत ठोकले शतक

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), दीपक हुड्डा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, आर अश्विन, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.