scorecardresearch

ॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट! जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…

आज ॠषभ पंतचा वाढदिवस असून त्याला त्याच्या प्रेयसीने एक स्पेशल गिफ्ट दिले आहे. अल्पावधीत आपल्या शानदार खेळाने त्याने अनेक चाहते निर्माण केलेत.

ॠषभ पंतला गर्लफ्रेंडकडून मिळाले बर्थ डे स्पेशल गिफ्ट! जाणून घ्या त्या खास गिफ्टबद्दल…
सौजन्य- जनसत्ता

भारतीय संघाचा आघाडीचा यष्टीरक्षक फलंदाज ॠषभ पंतचा आज २५वा वाढदिवस आहे. अल्पावधीत आपल्या शानदार खेळाने त्याने अनेक चाहते निर्माण केलेत. भारतीय संघाच्या नियमित सदस्यांपैकी एक असलेल्या पंतला सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसतायेत. ‌‌त्याचवेळी त्याची गर्लफ्रेंड असलेल्या ईशा नेगीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पण या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलानेही पंतला वेगळ्याच पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे त्याची चर्चा आहे. ॠषभ आणि उर्वशी यांच्या काही दिवसांपासून वाद पाहायला मिळाला होता. पण आता सगळी भांडणे आणि वादविवाद विसरून उर्वशीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. साहजिकच तो व्हिडीओ लगेच व्हायरल झाला. उर्वशीच्या या पोस्टवर युजर्सनी धमाल कमेंट्स केल्या.

आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो खेळणार आहे. तसेच आगामी टी२० विश्वचषकमध्ये देखील त्याची निवड करण्यात आली आहे. ॠषभ जितका त्याच्या आक्रमक खेळासाठी चर्चेत असतो तितकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत असते. त्याच्या वाढदिवसादिनी त्याची प्रेयसी ईशा नेगीने इंस्टाग्रामवर ॠषभच्या अनेक छायाचित्रांसह व्हिडिओ तयार केला असून तो इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. तसेच तिने त्या छायाचित्रांसाठी ‘हॅपी बर्थडे माय लव्ह’ असे कॅप्शनही दिले आहे. ॠषभ आणि ईशा मागील बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करतात. त्यांनी हे नाते सर्वांसमक्ष स्वीकारले देखील आहे. ईशाच्या वाढदिवसादिनीदेखील त्याने तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

आज त्याच्या खेळीवर सर्व चाहत्यांसह संघ व्यवस्थापनाची ही नजर असणार आहे. उर्वशी रौतेलाने पोस्टमध्ये फक्त इतकेच लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ उर्वशीने तिच्या पोस्टमध्ये कुठेही ॠषभ पंतच्या नावाचा उल्लेख केलेला नाही.पण अलीकडच्या काही दिवसांत जे काही त्यांच्यात घडले ते पाहता ही पोस्ट केवळ पंतसाठीच केली गेली असावी असा अंदाज प्रेषक व्यक्त करत आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंटमध्येही याचा उल्लेखही केलेला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या