scorecardresearch

Premium

BLOG : ऑस्ट्रेलिया म्हणते इंग्लंडने पीटरसनला खोटा डच्चू दिलाय…

पीटरसन पुन्हा इंग्लंड कडून खेळणार की नाही, हे काळ ठरवेल.

BLOG : ऑस्ट्रेलिया म्हणते इंग्लंडने पीटरसनला खोटा डच्चू दिलाय…

अखेर केविन पीटरसनला इंग्लंडने डावलले. पीटरसनला कमबॅकची खूप आशा होती. कारण त्याच्या मते इंग्लड क्रिकेट बोर्डाचे नवीन अध्यक्ष कॉलिन ग्रेवज यानी त्याला सांगितलं होतं की, तू काऊंटी क्रिकेटमध्ये खेळून भरपूर धावा जमव आणि तुझी केस बळकट कर. पीटरसनला वाटले काऊंटीत धावा केल्या तर परतीचा मार्ग प्रशस्त होणार. सरेकडून खेळताना त्याने लिस्टरविरुद्ध ३५५ धावा केल्या. आता तर त्याच्या आशेचे रूपांतर खात्रीत झाले. पण इंग्लड बोर्डाचे नविन डायरेक्टर आणि माजी कर्णधार अँड्रू स्ट्राउसने त्याला लाल निशाण दाखवून त्याच्या स्वप्नरंजनाला लगाम घातला. स्ट्राउसने त्याला सांगितले की, तुझ्याबद्दल इंग्लिश क्रिकेटमध्ये विश्वासाचे वातावरण नाही. पीटरसनला तोंडावर पडल्यासारखे झाले (फील्डवर डाइव्हन मारता). आता इसीबी आणि पीटरसनमध्ये चांगलीच जुंपली आहे.
पीटरसनचे काय चुकते?
पीटरसन नैसर्गिक देणगी लाभलेला अद्वितीय क्रिकेटपटू आहे. क्रिकेटमधल्या अवघड गोष्टी त्याला लीलया जमतात. तो श्रेष्ठ मॅचविनर आहे. त्यामुळे मोठा क्राउडपुलर पण आहे. अशा लोकांना स्वत:ची किंमत माहिती असते. म्हणून हे लोक आपल्या फायद्यासाठी व्यवस्था वाकवायला बघतात. शिस्त, संघभावना, सराव यांची खिल्ली उडवतात आणि आपल्याबरोबर इतरानासुद्धा बिघडवतात. आफ्रिका दौऱ्यावर असताना आपल्याच कर्णधाराविरुद्ध प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना मेसेज पाठवणे, कर्णधाराला काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणे, स्वत:च्या जाहिरातीच्या आणि इतर करारांसमोर राष्ट्रीय संघाला दुय्यम महत्त्व देणे, आत्मचारित्रातून जवळ जवळ सगळ्या संघातील खेळाडूंशी वैर जाहीर करणे असे अनेक संघाला मारक उद्योग त्याने केले आहेत.
इंग्लंडमधल्या माजी खेळाडूंच मत काय?
इंग्लंडचे सर्व जुने खेळाडू मानतात की पिटरसन हा सांभाळायला अवघड खेळाडू आहे. पण तो मॅचविनर असल्याने समजुतीने मार्ग काढायला हवा. नासीर हुसेन म्हणतो की संघ व्यवस्थापनाला मॅन मॅनेजमेंटचे पैसे मिळतात. मग हा प्रॉब्लेम सोडवायला हवा. कर्णधार कुक, ब्रॉड, एंडरसन यांना तो अजिबात नको आहे. स्ट्राउसने देखील ठरवून टाकले आहे की पीटरसन नकोच.
इंग्लंडच्या क्रिकेट रसिकाना काय वाटतं?
इंग्लंडचे बहुतांश क्रिकेट रसिक चिडलेले आहेत. त्यांच्या मते पीटरसन नसेल तर इंग्लंडला भवितव्य नाही. इंग्लंड ५-० ने अॅशेस हरणार. आधीच वर्ल्डकप मधल्या खराब खेळाने रसिक नाराज आहेत. पिटरसनवर स्ट्राउस वैयक्तिक सुड उगवत आहे, अशी ओरड चालू आहे. बऱयाच लोकांनी अॅशेसची तिकिटे परत करण्याचा निर्णय घेतलाय.
ऑस्ट्रेलियाला काय वाटतंय?
इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांचं क्रिकेटमध्ये हाडवैर असल्याने ऑस्ट्रेलियाला वाटतय की पीटरसन नाही, असं भासवून आम्हाला गाफील ठेवण्याचा हा डाव असू शकतो. ऐनवेळेस इंग्लंड त्याला संघात घेऊ शकते. एका खेळाडूने एव्हढे रान उठवले आहे म्हणजे त्याचं वलय किती आहे हे लक्षात येतंय.
पीटरसन पुन्हा इंग्लंड कडून खेळणार की नाही, हे काळ ठरवेल. आधी शब्द देऊन तो ऐनवेळेस फिरवल्याने ज्या स्विच हिटचा शोध आपण लावला तोच आपल्याविरुद्ध वापरून आपल्याला इंग्लडने टोलवले, अशी पीटरसनची भावना आहे.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Tanushree Dutta on Her marriage
“…तर २०१८ मध्येच माझं लग्न झालं असतं”, तनुश्री दत्ताचा खुलासा; ‘या’ व्यक्तीचं नाव घेत म्हणाली, “लोकांचे आयुष्य बरबाद…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-05-2015 at 01:15 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×