वृत्तसंस्था, सिडनी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक पाचव्या सामन्यातील पराभवामुळे प्रतिष्ठेचा बॉर्डर-गावस्कर करंडक गमावण्यासह भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय अनिवार्य होता. मात्र, सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या (एससीजी) गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही.

Ravi Shastri Said India Chances To Win Champions Trophy 2025 Will Be Decreased 30 Percent If Jasprit Bumrah Will Not Play
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल

ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकताना दशकभरानंतर बॉर्डर-गावस्कर करंडक उंचावला. यासह ऑस्ट्रेलियाने ११ ते १५ जून या कालावधीत इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठीही पात्रता मिळवली. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतील गतविजेते असून यंदा त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.

‘डब्ल्यूटीसी’मध्ये दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी ६६.६७ अशी असून ते अग्रस्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ ६३.७३ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. सिडनीतील पराभवामुळे भारतीय संघाचे गुणांकन ५० टक्क्यांवर घसरले.

हेही वाचा >>>IND vs AUS: “त्याचं काही घेणं देणं नव्हतं…”, गौतम गंभीरने सॅम कॉन्स्टासला सुनावले खडे बोल, जसप्रीतबरोबर घातला होता वाद

गतवर्षीच्या अखेरीस मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्यासाठी सुस्थितीत होता. मात्र, न्यूझीलंडने भारताला ०-३ अशी धूळ चारली. त्यामुळे अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत किमान चार सामने जिंकावे लागणार होते. भारताने या मालिकेची विजयासह सुरुवात केली, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. भारतीय संघाने पुढील चारपैकी तीन सामने गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अधुरेच राहिले.

गेल्या दोन पर्वांत भारताला अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’च्या नव्या पर्वाला सुरुवात करेल.

Story img Loader