What is Monkeygate Controversy: भारत आणि ऑस्ट्रेलिया या कट्टर प्रतिस्पर्धींमधील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही कसोटी मालिका २२ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. अ‍ॅशेस किंवा भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील रणधुमाळीपेक्षा अधिक रोमांचकता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतींमध्ये हल्ली दिसून येते. पूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ असायचा. मात्र गेल्या काही काळापासून भारतीय संघाने आपला दबदबा कायम राखला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अनेकदा स्लेजिंग पाहाला मिळालं. त्यामुळे मैदानावर अनेकदा वादाला तोंड फुटताना दिसत आहे. अशाच एका गाजलेल्या मंकीगेट प्रकरणाबाबत जाणून घेऊयात.

२००८ मध्ये हरभजन सिंग आणि अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स यांच्यात प्रसिद्ध ‘मंकीगेट’ प्रकरण गाजले होते. २००७-०८ मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. त्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ३३७ धावांनी जिंकला होता. दुसरा सामना ६ जानेवारी २००८ पासून सिडनी येथे खेळवला गेला. या कसोटीत सायमंड्स फलंदाजी करत असताना सायमंड्सचा हरभजनबरोबर वाद झाला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – Border Gavaskar Trophy: भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ हे नाव का देण्यात आलं? सर्वाधिक मालिका कोणी जिंकल्यात? वाचा इतिहास

२००८च्या सिडनी कसोटीत हरभजन सिंगने वर्णभेदात्मक शेरेबाजी करीत माकड संबोधल्याचा आरोप सायमंड्सने केला होता. मात्र हे आरोप हरभजनने फेटाळले होते. सामनाधिकारी माइक प्रॉक्टर यांनी संवेदनात्मक पद्धतीने हे प्रकरण हाताळून हरभजनवर तीन सामन्यांची बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला; परंतु मग भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत त्याचा निषेध केला आणि दौरा रद्द करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणाच्या सुनावणी झालेल्या सुनावणीमध्ये सचिन तेंडुलकरने हरभजनकडून साक्ष दिली होती. या प्रकरणात सचिन तेंडुलकरची जबानी महत्त्वाची ठरली होती.

हेही वाचा – Mohammed Shami: भारतीय संघासाठी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपूर्वी आनंदाची बातमी, मोहम्मद शमीच्या ‘या’ तारखेला क्रिकेटच्या मैदानावर करणार पुनरागमन

हरभजन सिंग आणि सायमंड्समध्ये नेमका वाद सुरू कसा झाला?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००८ मध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यात हे प्रकरण घडलं. सिडनी मैदानावर झालेल्या या सामन्यात पंचानी दिलेल्या चुकीच्या निर्णामुळे भारतीय संघातील खेळाडू आधीच वैतागले होते. या सामन्यात पंचानी ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं सहा ते सात निर्णय दिले होते. स्टीव्ह बकनर यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णायामुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकला होता. रिकी पॉटिंग आणि सायमंड्स बाद असतानाही बकनर यांनी त्यांना बाद घोषित केलं नव्हतं. परिणामी सायमंडसनं १६३ धावांची खेळी केली. १९१ वर सहा बाद असताना सायमंड बाद असतानाही पंचानी चुकीचा निर्णय दिला.

हेही वाचा – Prithvi Shaw: पृथ्वी शॉचा वाढदिवसाच्या पार्टीत ‘तांबडी चामडी’ गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर होतोय ट्रोल, VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलियाने अशारितीने पहिल्या डावात ४६३ धावा काढल्या होत्या. पंचांनी निर्णय व्यवस्थित दिले असते तर ऑस्ट्रेलियाचा संघ ३०० धावांपर्यंत पोहचू शकला असता, असेही काही दिग्गज सांगतात. भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना बकनर यांनी बाद नसतानाही खेळाडूंना बाद दिलं. यामध्ये राहुल द्रविड, सौरव गांगुली, जाफर यासारखे खेळाडू होते. त्यानंतरही भारतीय संघ पहिल्या डावात सात बाद ४५१ धावांवर होता. त्यावेळी मैदानावर असणाऱ्या सचिन आणि भज्जीला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघानं स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. ब्रेट लीच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर सायमंड आणि भज्जीमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी हे प्रकरण खूप साधारण वाटलं. मात्र, पंच मार्क बेनसॉन यांनी हरभजन यानं सायमंडविरोधात अर्वच्य भाषा (माकड म्हणून संबोधल्याचा) वापरल्याचा आरोप केला. त्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आलं. त्यानंतर आयसीसीने हरभजनवर तीन सामन्याची बंदी घातली. या प्रकरणानंतर एक कमिटी बसवण्यात आली. यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून सायमंडसोबत पॉन्टिंग आणि हेडन होते. तर हरभजनसोबत सचिन तेंडुलकर होता.

असभ्य भाषेत बोलल्याचा ठपका ठेवत आयसीसीने हरभजनवर तीन सामन्याची बंदी जाहीर केली. त्यानंतर भारतीय संघातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यावर सोडणार असल्याचं बीसीसीआयला कळवलं. हरभजन सिंहने असं कोणतेही वक्तव्य केलं नव्हतं, उलट सामन्यात अनेक निर्णय आमच्याविरोधात देण्यात आले होतं, असंही संघातील काही ज्येष्ठ खेळाडूंनी बीसीसीआयला कळवलं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही बाब सामंजस्यानं मिटवण्याची भूमिका घेतल्यानंतर पॉटिंग आणि गिलख्रिस्ट यांनी नाराजी व्यक्त केली होती.

ज्येष्ठ खेळाडूंनी दिलेल्या माहितीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खंबीर भूमिका घेत या प्रकरणाचा निषेध केला आणि दौरा अर्ध्यावर सोडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर भज्जीवरील बंदीचा निर्णय रद्द करीत अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मानधनातील ५० टक्के रक्कम कापण्यात आली.

मायकल क्लार्कने एका षटकात तीन विकेट घेत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला. पण हरभजन-सायमंड वादामुळे दोन्ही संघात तणावाचं वातावरण होतं. सामन्याच्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या संघानं नियमाप्रमाणे भारतीय संघाचा कर्णधार अनिल कुंबळेसोबत हस्तांदोलनही केलं नाही. अॅडम गिलख्रिस्टनं यावर स्पष्टीकरण देताना सांगितलं की, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी नंतर ड्रेसिंग रुममध्ये जाऊन कुंबळेशी हस्तांदोलन केलं होतं.

Story img Loader