टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइनचा उपांत्य फेरीत पराभव झाल्याने सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं आहे. मात्र पराभूत झाल्यानंतरही कांस्यपदक जिंकत लव्हलिनाने आपल्या नावे विक्रम केला आहे. लव्हलिनाने कांस्यपदकावर आपलं नाव कोरताना काही खास विक्रम केले आहेत. लव्हलिना बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी दुसरी भारतीय महिला ठरली आहे. याआधी मेरी कोमने ही कामगिरी केली आहे.

Tokyo 2020: भारताची लव्हलिना पराभूत; कांस्य पदकावर समाधान

इतकंच नाही तर ईशान्य भारतामधील राज्यांमधून आलेली आणि ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी लव्हलिना तिसरी महिला आहे. तसंच मेरी कोम आणि विजेंदर सिंग यांच्यानंतर बॉक्सिंगमध्ये पदक पटकावणारी ती तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.

वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

उपांत्य फेरीत लव्हलिनासमोर जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीचे कडवे आव्हान होतं. ही लढत जिंकल्यास ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कोणत्याही वजनी गटाची अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली बॉक्सिंगपटू ठरण्याची संधी लव्हलिनाकडे होती. मात्र बुसेनाझ सुर्मेनेलीने केलेल्या आक्रमक खेळीमुळे लव्हलिनाचा पराभव झाला. २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बुसेनाझने सुवर्ण मिळवले होते, तर लवलिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.