scorecardresearch

Australian Open 2023 : ग्रँडस्लॅमसह निवृत्तीचं सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव!

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात ब्राझीलच्या स्टेफनी-राफेल मॅटोस यांचा विजय झाला आहे.

australian Open 2023 Mixed Doubles final
सौजन्य- Australian Open 2023 (ट्विटर)

ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा जोडीचा पराभव झाला आहे. ब्राझीलच्या लुईसा स्टेफनी-राफेल मॅटोस यांनी मिर्झा-रोहन बोपण्णा जोडीचा ७-६, ६-२ अशा फरकाने पराभव केला. तत्पूर्वी मिर्झा बोपण्णा जोडीने उपांत्य फेरीत डेसिरे क्रॉझिक आणि नील स्कुप्स्की यांचा पराभव करत अंतिम सामन्यात धडक दिली होती.

हेही वाचा – MS Dhoni in Ranchi: नारळपाण्यासह ‘थलायवा माही’ पोहोचला थेट टीम इंडियाच्या भेटीला! इशान, हार्दिकची फिरकी घेणारा Video व्हायरल

या पराभवानंतर ग्रँडस्लॅमसह निवृत्ती घेण्याचं सानिया मिर्झाचं स्वप्नही भंगलं आहे. आपला कारकीर्दीतील शेवटचे ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळत असलेल्या सानिया मिर्झाने यापूर्वी तीन महिला दुहेरी ग्रँडस्लॅम आणि तीन मिश्र दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.

हेही वाचा – सानिया मिर्झाचा प्रोफेशनल टेनिसला अलविदा! सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत जाहीर केला निर्णय

दरम्यान, या पराभवानंतर बोलताना, “ही माझी शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. ग्रँडस्लॅममध्ये मी माझ्या मुलासमोर खेळेन असा कधीच विचार केला नव्हता.मी माझ्या कारकीर्दीची सुरूवात २००५ मध्ये याच मेलबर्नमधून केली होती. त्यावेळी मी केवळ १८ वर्षांची होती. शेवटचे ग्रँडस्लॅम खेळण्यासाठी यापेक्षा चांगलं मैदान दुसरं कोणतंच असू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया सानिया मिर्झाने दिली. यावेळी ती भावूक झाल्याचंदेखील बघायला मिळालं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 08:41 IST